t20 world cup 2022
t20 world cup 2022 sakal
क्रीडा

T20 World Cup 2022 : वर्ल्ड कप साठी अद्याप 'या' 4 देशांनी संघ केले नाही जाहीर

Kiran Mahanavar

T-20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून T20 वर्ल्ड कप 2022 सुरूवात होणार आहे. भारत आणि पाकिस्तानसह बहुतेक देशांनी वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर केला आहे. परंतु 4 संघाने निर्धारित वेळेपर्यंत संघ जाहीर केला नाही. न्यूझीलंड व्यतिरिक्त स्कॉटलंड, आयर्लंड आणि UAE या देशांनी 2022 च्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अद्याप आपला संघ जाहीर केलेला नाही. आशिया चषक 2022 चे विजेते श्रीलंकेने या स्पर्धेसाठी नुकताच आपला संघ जाहीर केला होता. त्याचबरोबर पाकिस्ताननेही आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.

यावेळी आशियाई करंडक जिंकलेल्या संघातील खेळाडूंनाच विश्वकरंडकासाठी संधी देण्यात आली आहे. दुशमंता चामीरा व लहिरू कुमारा यांचे मात्र पुनरागमन झाले आहे. मात्र त्यांचा सहभाग हा त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. माथीशा पाथीराना व असिस्था फर्नांडो या दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अशेन बंदारा व प्रवीण जयविक्रमा यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याच वेळी, न्यूझीलंड 20 सप्टेंबरला आपला संघ जाहीर करेल. निर्धारित मुदत संपल्यानंतर न्यूझीलंडने आयसीसीकडे आणखी वेळ मागितला आहे.

भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप साठी संघ जाहीर केला आहे. 2022 च्या टी-20 वर्ल्ड कप साठी रोहित शर्माला कर्णधार तर केएल राहुलला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. याशिवाय अर्शदीप सिंगलाही संघात स्थान मिळाले आहे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेनेही आपला संघ जाहीर केला आहे, परंतु न्यूझीलंड व्यतिरिक्त स्कॉटलंड, आयर्लंड आणि यूएईने निर्धारित कालावधी असूनही अद्याप संघ जाहीर केलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर अडचणीत? ठाकरे गटाने पाठवली नोटीस; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : भाजप पक्ष माझ्यासोबत उभा आहे, म्हणूनच माझ्या मुलाला उमेदवारी मिळाली- ब्रिजभूषण सिंह

Hardik Pandya: हार्दिकला कसा मिळाला BCCI चा 'अ' श्रेणीचा करार? जय शाहांनी सांगितलं काय होती अट..

Narendra Dabholkar Case Live Updates: निकालाला इतकी वर्षे लागल्याने आम्ही अस्वस्थ होतो: पवार

Mumbai Local: "एक अबोल प्रेम कथा"; 'मुंबई लोकल' मध्ये झळकणार ज्ञानदा अन् प्रथमेश परब, पोस्टरनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT