PM Modi_Team India 
क्रीडा

T20 World Cup 2022: पराभवानंतर पाकच्या पंतप्रधानांकडून टीम इंडियाची क्रूर थट्टा!

टी-ट्वेंटी वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडनं भारताचा १० गडी राखून पराभव केला. यानंतर भारत स्पर्धेतून बाद झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

इस्लामाबाद : T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या क्रिकेटच्या टी-ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये गुरुवारी सेमी फायनलमध्ये भारताचा दारुण पराभाव झाला. इंग्लंडनं भारताचा १० गडी राखून पराभव केला, यामुळं भारत या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. पण यावर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी ट्विट करत भारताची क्रूर थट्टा केली आहे. (T20 World Cup 2022 Pakistan PM Shehbaz Sharif takes a dig at Team India after their semi final loss)

भारताला हारवून सेमी फायनलमध्ये इंग्लंडचा विजय झाल्यानं इंग्लड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकपचा फायनल सामना होणार आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी ट्वीट केलं आणि म्हटलं की, "तर आता या रविवारी 152/0 आणि 170/0 या दोघांमध्ये फायनल होणार आहे" आता हे ट्वीट तुम्हाला गोंधळात टाकू शकतं. कारण आजच्या सेमी फायनलमध्ये भारतानं टॉस हारल्यानं पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. त्यानंतर भारताचा डाव १६८ धावांवर ६ गडी गमावले. त्यानंतर इंग्लंडनं फलंदाजी करताना एकही गडी न गमावता १७० धावा करत भारतावर एकहाती विजय मिळवला. त्यानंतर भारताचं या वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आलं.

गेल्यावर्षी युएईमध्ये टी-ट्वेंटी वर्ल्डकप पार पडला होता. यामध्ये कोणत्याही वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताननं पहिल्यांदा भारताचा पराभव केला होता. दुबईत झालेल्या या सेमी फायनलमधील भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्ताननं एकही गडी न गमावता १५२ धावा ठोकल्या होत्या. त्यामुळं गेल्यावर्षी पाकिस्ताननं भारताचा केलेला पराभव आणि आत्ता इंग्लंडनं भारताचा केलेला पराभव या दोन्हींचा आपल्या ट्विटमध्ये उल्लेख करत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतीय संघाला डिवचलं आहे.

दरम्यान, येत्या रविवारी १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये अंतिम सामना होणार आहे. जर आजच्या सेमी फायनलमध्ये इंग्लडवर भारतानं विजय मिळवला असता तर हाच अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये पार पडला असता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT