क्रीडा

T20 World Cup : लंकेचा कित्ता विंडीजनेही गिरवला! स्कॉटलँडचा 42 धावांनी मोठा विजय

T20 विश्वचषकात 2 दिवसांत 2 मोठे उलटफेर, 2 वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिजचाही पहिल्याच सामन्यात पराभव

Kiran Mahanavar

T20 World Cup 2022 : टी-20 विश्वचषकात पहिल्याच सामन्यात नामिबियाच्या संघाने आशियाई कप चॅम्पियन श्रीलंकेच्या संघाचा 55 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. वेस्ट इंडिजच्या संघालाही चांगली सुरुवात करता आली नाही. टूर्नामेंटच्या एका सामन्यात स्कॉटलंडने सोमवारी वेस्ट इंडिजचा 42 धावांनी पराभव केला. त्यामुळे लंकेचा कित्ता विंडीजनेही गिरवला असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

वेस्ट इंडिज संघाने दोनदा टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले असले तरी चालू हंगामात त्यांना चांगली सुरुवात करता आली नाही. गेल्या विश्वचषकातही त्याची कामगिरी विशेष राहिली नव्हती. या सामन्यात स्कॉटलंडने प्रथम खेळताना 5 गड्यांच्या मोबदल्यात 160 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ 118 धावा करून सर्वबाद झाला.

लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली होती. एकवेळ संघाची धावसंख्या एका विकेटवर 53 धावा होती. यानंतर संघची धावसंख्या 8 गडी बाद 79 अशी झाली. म्हणजेच अवघ्या 26 धावांत संघाने 7 विकेट गमावल्या. डावखुरा फिरकी गोलंदाज मार्क वॉटने 4 षटकांत 12 धावा देत 3 बळी घेतले. विंडीजचे 7 फलंदाज दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. जेसन होल्डरने सर्वाधिक 38 धावा केल्या, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

यापूर्वी स्कॉटलंडसाठी मुनसेने 53 चेंडूत नाबाद 66 धावा केल्या. मिचेल जोन्सने 20 आणि कॅलमने 23 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफ आणि जेसन होल्डरने 2-2 विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GSAT-7R Satellite: भारतीय सैन्याची अंतराळात नवी ताकद! इस्रोकडून सर्वात प्रगत उपग्रह बाहुबली प्रक्षेपित; वैशिष्ट्य काय?

Baba Vanga Prediction : येत्या 60 दिवसांत 4 राशी होणार मालामाल ! बाबा वांगाची भविष्यवाणी उघड

MPSC Success Story: 'राजेश इंदोरे एमपीएससीच्या वर्ग एक परीक्षेत राज्यात ४३ वा': आईच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू, कष्टाच्या जाेरावर यशाल गवसणी

Cow E-attendance: गायींनाही आता ई-अटेंडन्स द्यावा लागणार! एक विशेष मायक्रोचिप विकसित; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi Horoscope Prediction : आजपासून फक्त 24 दिवसांमध्ये बदलणार 'या' राशींचं नशीब ! बक्कळ श्रीमंतीचा योग

SCROLL FOR NEXT