shimron hetmyer dropped from west indies squad after missing flight to australia sakal
क्रीडा

दोनदा फ्लाइट मिस करणे 'या' खेळाडूला पडले महागात; T20 World Cup संघातून पत्ता कट

दोनदा विमान सोडल्यामुळे बोर्डाने या खेळाडूला टी-20 वर्ल्ड कप संघातून वगळले

Kiran Mahanavar

T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषकाला दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी बाकी आहे. अशा स्थितीत अनेक खेळाडू दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे, तर काही खेळाडू विश्वचषकापूर्वीच दुखापतींमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायरला विश्वचषक संघातून वगळले आहे.

संघाचा स्टार फलंदाज शिमरॉन हेटमायर टी-20 विश्वचषकातून बाहेर झाला आहे, पण त्याला दुखापत झाली नाही, तर फ्लाइट मिस झाल्यामुळे बोर्डाने त्याला टी-20 वर्ल्ड कप संघातून वगळले आहे. हेटमायरच्या जागी फलंदाज शामराह ब्रूक्सचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळू शकणार नाही. वेस्ट इंडिजला सुपर-12 पूर्वी पात्रता फेरीत खेळायचे आहे.

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने हेटमायरसाठी यापूर्वीच एकदा फ्लाइटचे वेळापत्रक बदलले आहे. याआधी 1 ऑक्टोबर ऑस्ट्रेलियाला रवाना होणार होते. परंतु कौटुंबिक कारणास्तव हेटमायरचे फ्लाइट 3 ऑक्टोबर पुन्हा शेड्यूल करण्यात आले. मात्र यावेळी तो वेळेवर विमानतळावर पोहोचला नाही. यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड नाराज झाला आणि त्याला संघातून काढून टाकले. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घाईत घेतला नाही. त्याने हेटमायरला आधीच इशारा दिला होता की त्याने आणखी उशीर केल्यास त्याचा फटका आपल्याला सहन करावा लागेल.

वेस्ट इंडिजचा संघ

निकोलस पूरन (कर्णधार), रोव्हमन पॉवेल (उपकर्णधार), यानिक कॅरिया, जॉन्सन चार्ल्स, शेल्डर कॉटरेल, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, काइल मेयर्स, ओबेद मॅककॉय, ओडियन स्मिथ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झुपेडियानं लुटलं! फोटोला रिव्ह्यू देताच पैसे मिळणार, स्कीमने गंडवलं; तरुणांसह शिक्षक अन् कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Latest Marathi News Updates : आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या सुरक्षेत मोठी चूक...

Crime News: प्रेमविवाहाचा भीषण शेवट! पतीने पत्नीला रस्त्यावर गोळ्या घालून संपवलं, मृतदेहाजवळ पिस्तूल घेऊन उभा राहीला

"मला तो मुलगा आवडला" लग्नाबद्दल रिंकूचा खुलासा; म्हणाली "मी अतिशय भावनिक.. "

Nagpur Accident: नागपूरच्या गिट्टीखदान चौकात शिवशाही बसच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT