T20 World Cup
T20 World Cup sakal
क्रीडा

T20 World Cup : लाइव्ह मॅचमध्ये बॅट्समन पडला तोंडावर, व्हिडिओ व्हायरल

Kiran Mahanavar

T20 World Cup : टी-20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात नामिबियाच्या संघाने श्रीलंकेच्या संघाचा 55 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. दिवसाचा दुसरा सामना संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँड्स यांच्यात गिलॉन्गच्या सिमंड्स स्टेडियमवर खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना UAE ने नेदरलँड्ससमोर 112 धावांचे लक्ष्य ठेवले आणि नेदरलँड्सने सात विकेट्सच्या मोबदल्यात ते पूर्ण केले. युएईच्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर एक मजेदार घटना घडली कारण अयान अफजल खान बाद झाल्यानंतर सीमारेषेवरून तोंडावर पडला.

गिलॉन्ग येथे झालेल्या या सामन्यात UAE ने प्रथम फलंदाजी केली पण त्यांचे फलंदाज काही विशेष करू शकले नाहीत. सतत काही अंतराने विकेट पडत राहिल्या. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अयानला 7 चेंडूत केवळ 5 धावा करता आल्या. आठव्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून लवकर आऊट होणे ही त्याच्यासाठी लाजिरवाणे नव्हते. पण त्यानंतर जे घडले त्यामुळे त्याला जरा लाज वाटली असेल. डावाच्या शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अयान बाद झाला. तो पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याचा पाय बाउंड्रीच्या रेषेला अडकला. त्याचा तोल गेला आणि तो त्याच्या तोंडावर पडला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर UAE ने 20 षटकात 8 गडी गमावून फक्त 111 धावा केल्या. सलामीवीर महंमद वसीमने आपल्या बाजूने सर्वाधिक 41 धावा केल्या पण त्यासाठी त्याने 47 चेंडू खेळले. 112 धावांचा पाठलाग करताना नेदरलँडलाही हे लक्ष्य गाठण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. नेदरलँड्सने हे लक्ष्य सामन्याच्या शेवटच्या षटकात गाठले. नेदरलँड्सकडून मॅक्सोडने 23 धावा केल्या, तर शेवटी कर्णधार स्कॉट एडवर्डने 16 धावांची मौल्यवान खेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

Parineeti Chopra : पतीसाठी परिणीतीच्या लंडनला फेऱ्या; राघववर पार पडली मोठी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT