t20 world cup final match icc tickets price down  sakal
क्रीडा

T20 World Cup : टीम इंडियाचा पराभव, ICC ला दणका! अंतिम सामन्याच्या तिकिटांच्या दरात घसरण

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना न झाल्याचा फटकाही आयसीसीला सहन करावा लागणार....

Kiran Mahanavar

T20 World Cup : टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. अॅडलेड ओव्हलवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर 169 धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु त्यांनी हे लक्ष्य 16 षटकांतच गाठले. यादरम्यान अॅलेक्स हेल्स आणि कर्णधार जोस बटलर यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. हेल्सने 86 तर बटलरने 80 धावांची नाबाद खेळी खेळली.

अंतिम सामन्यात इंग्लंड आणि पाकिस्तान मध्ये 13 नोव्हेंबरला रविवारी होणार आहे, हा अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणार आहे. भारतीय संघ आता अंतिम फेरीत खेळणार नसल्याने या सामन्याच्या तिकीट दरात घट झाली आहे. पहिल्यादा अंतिम सामन्यासाठी किमान तिकीटाची किंमत $ 299 (सुमारे 24 हजार चारशे रुपये) होती, जी आता $ 225 (सुमारे 18 हजार रुपये) वर आली आहे. त्याच वेळी मुलांसाठी तिकिटाची किंमत $ 60 पर्यंत खाली आली आहे.

जर भारतीय संघाने उपांत्य फेरीचा सामना जिंकला असता तर 13 तारखेला मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक लढत झाली असती. अशा स्थितीत मेलबर्न क्रिकेट मैदान सुमारे एक लाख प्रेक्षकांनी खचाखच भरले असते, पण इंग्लंड-पाकिस्तानच्या फायनलमुळे त्याची आशा काहीशी कमी दिसत आहे. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना न झाल्याचा फटकाही आयसीसीला सहन करावा लागणार आहे. भारत-पाकिस्तान फायनल झाली असती तर जाहिरात कंपन्या, आयसीसीचे भागीदार, ब्रॉडकास्टर यांना भरपूर पैसा मिळाला असता.

मेलबर्नमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची तिकिटे खरेदी करण्यासाठी, क्रिकेट चाहत्यांना T20worldcup.com या ICC T20 विश्वचषकाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तिकीट श्रेणीतील BY Tickets वर क्लिक करा. एकदा आपण पृष्ठ उघडल्यानंतर, तेथे श्रेणी दिसून येईल. आता तुम्ही पाहू इच्छित सामने निवडू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT