PAK vs BAN T20 World Cup 2022 sakal
क्रीडा

PAK vs BAN Cheaters : नव्या वादाला तोंड फुटंल! पाकिस्तानवर फसवणूक केल्याचा आरोप

Kiran Mahanavar

PAK vs BAN T20 World Cup 2022 : टी-20 विश्वचषक 2022 मध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणार्‍या सामन्यादरम्यान नवा वाद निर्माण झाला आहे. पंचांच्या निर्णयानंतर पाकिस्तान संघाने फसवणूक केल्याचा आरोप क्रिकेट चाहते करत आहेत. अंपायरच्या निर्णयाला क्रिकेट चाहते सोशल मीडियावर विरोध करत आहेत.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या डावातील 11व्या षटकातील 5व्या चेंडूवर पाकिस्तानचा लेगस्पिनर शादाब खानने शकीब अल हसनला बाद केले. अंपायरने त्याला एलबीडब्ल्यू घोषित केले, शाकिब अंपायरच्या या निर्णयावर खूश नव्हता आणि त्याने डीआरएस घेतला, त्यानंतरही त्याला आऊट देण्यात आले.

डीआरएस घेतल्यानंतर चेंडू आधी बॅटला लागला की नाही हे रिप्लेमध्ये स्पष्ट झाले नाही. चेंडू बॅटला लागला नसून बॅट जमिनीवर आदळल्याचे तिसऱ्या पंचाने मान्य केले. अंपायरच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप अनावर झाला, शाकिब अल हसन नाबाद असल्याचे चाहत्यांना वाटत आहे, आणि तो पाकिस्तान संघावर फसवणूक केल्याचा आरोप करत आहे.

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात 41व्या सामन्यात सामना रंगला होता. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशने 20 षटकांत 8 बाद 127 धावा केल्या. पाकिस्तानने 18.1 षटकात 5 विकेट गमावत 128 धावा करत सामना जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT