Team India For T20 WC : 
क्रीडा

Team India : टी-20 वर्ल्ड कप कसा जिंकणार? टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वीच टीम इंडिया दुखापतीने घायाळ!

दुखापतग्रस्त टीम इंडिया टी-20 वर्ल्डकपच्या मिशनमध्ये अखेर यशस्वी कशी होणार.

Kiran Mahanavar

Team India For T20 World Cup : टीम इंडिया मिशन टी-20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे, आता पर्थमध्ये टीम इंडियाचा सराव सुरू झाला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी आहे. मिशन सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला दुखापत झाली आहे. भारतीय संघ दुखापतीने सतत त्रस्त आहे आणि ही अडचण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत दुखापतग्रस्त टीम इंडिया टी-20 वर्ल्डकपच्या मिशनमध्ये अखेर यशस्वी कशी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आशिया चषक स्पर्धेत रवींद्र जडेजा जखमी झाल्यामुळे टी-20 विश्वचषकापूर्वीच टीम इंडियाला धक्का बसला होता. रवींद्र जडेजा पहिल्यांदा आशिया चषकमधुन बाहेर पडला आणि त्यानंतर तो टी-20 वर्ल्डकपमधूनही बाहेर गेला. रवींद्र जडेजा हा संघाचा मुख्य अष्टपैलू खेळाडू आहे. जडेजानंतर टीम इंडियाला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या रूपाने संघाला दूसरा मोठा झटका बसला आहे. जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे बुमराह आशिया कपमध्येही खेळू शकला नाही. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलिया मालिकेत पुनरागमन केले मात्र दोन सामने खेळून तो बाहेर गेला.

दीपक चहरला देखील दुखापत झाली आहे. तो टीम इंडियाच्या टी-20 वर्ल्ड कप संघाचा भाग नव्हता. पण त्याचे नाव राखीव खेळाडूंच्या यादीत होते. जसप्रीत बुमराहच्या जागी त्याला संघात स्थान मिळू शकते असे मानले जात होता. मात्र आता तो स्वत: दुखापतग्रस्त झाला असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतूनही तो बाहेर जाऊ शकतो. दीपक हुड्डाही मध्यंतरी काहीशी अडचण आली होती. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून त्याला विश्रांती देण्यात आली, मात्र तो आता तंदुरुस्त असून टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

राखीव खेळाडू : मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT