Tanveer Sangha Australia T20I  esakal
क्रीडा

Tanveer Sangha : वडील सिडनीत चालवतात टॅक्सी... मुलाचं ऑस्ट्रेलियाकडून दमदार पदार्पण, कोण आहे तनवीर?

अनिरुद्ध संकपाळ

Tanveer Sangha Australia T20I : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात डर्बन येथे पहिला टी 20 सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून तनवीर संघा या लेग स्पिनरने पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाच्या संघातील अव्वल लेग स्पिनर अॅडम झाम्पा आजारी पडल्याने भारतीय वंशाच्या तनवीर संघाला ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने 31 धावात 4 विकेट्स घेत पदार्पणाच्या सामन्यातच आपला दम दाखवून दिला.

तनवीर संघा हा इंग्लंडवरून दीर्घ विमान प्रवास करून डर्बन येथे पोहचला होता. बुधवारी तनवीर हा हॉटेलच्या जीममध्ये वर्कआऊट करत असताना त्याला कर्णधार मिचेल मार्शने तो पदार्पण करत असल्याचे सांगितले.

कोण आहे तनवीर संघा?

तनवीरचा जन्म 26 नोव्हेंबर 2001 मध्ये सिडनी येथे झाला. तनवीरने सिडनी येथील ईस्ट हिल्स बॉईज हाय स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्याचे वडील जोगा हे जलंदर येथील राहीमपूर गावचे रहिवासी होते.

जोगा हे सिडनीत ट्रक्सी चालवतात, तनवीरची आई अपनीत या अकाऊंटन्ट म्हणून काम करतात. तनवीरने बिग बॅश लीगमध्ये 12 डिसेंबर 2020 मध्ये सिडनी थंडरकडून पदार्पण केले होते. त्याने 2020 मध्ये झालेल्या 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने 15 विकेट्स घेतल्या होत्या.

बिग बॅश लीगमधील पदार्पणाच्या हंगामात त्याने दमदार कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर त्याची ऑस्ट्रेलिया संघात निवड झाली. त्याची 2021 च्या न्यूझीलंडविरूद्धच्या ट्रान्स - टास्मन टी 20 मालिकेत निवड झाली होती. त्याने याच वर्षी न्यू साऊथ वेल्स कडून शेफिल्ड शिल्डमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

तनवीर हा ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ संघात निवड होणारा दुसराच भारतीय मूळ असलेला खेळाडू आहे. यापूर्वी वेगवान गोलंदाज गुरिंदर संधूने 2015 मध्ये दोन वनडे सामने खेळले होते. तनवीरने नुकतेच द हंड्रेड स्पर्धेत भाग घेतला होता. त्याने तीन सामन्यात बर्मिंगहम फोनेक्सचे प्रतिनिधित्वक केले. तनवीरची भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठीच्या संभाव्य ऑस्ट्रेलियन संघात देखील वर्णी लागली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडले, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT