team india asia cup 2022 sakal
क्रीडा

Asia Cup: पराभवानंतरही टीम इंडिया फायनल मध्ये पोहोचू शकते, जाणून घ्या कसे

आशिया कप 2022 मध्ये टीम इंडिया फायनल कशी खेळणार?

Kiran Mahanavar

Team India Asia Cup 2022 : आशिया कप 2022 च्या सुपर फोर मध्ये भारतीय संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. भारताने श्रीलंकेला 174 धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी एक चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. या पराभवामुळे भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेतून जवळपास बाहेर पडला आहे. पण टीम इंडियाला फायनलच्या शर्यतीत राहण्याची एक संधी तरी आहे का?

अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला अफगाणिस्तानविरुद्धचा शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. एवढेच नाही तर त्यांच्या विजयाबरोबरच भारतीय संघाला इतर संघही आपला सामना गमावावा अशी प्रार्थना करावी लागेल. आज अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभूत केले तर भारतीय संघ स्पर्धेत कायम राहील. पाकिस्तानने विजय मिळवला तर भारत स्पर्धेबाहेर जाईल. आता अशा परिस्थितीत आजच्या सामन्यावर बरेच काही अवलंबून आहे.

पाकिस्तानी संघ अफगाणिस्तानकडून हरला तरी टीम इंडियाला पुन्हा दुसऱ्या सामन्याची वाट पाहावी लागणार आहे. हा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. जर श्रीलंकेने हा सामना जिंकला तर ते सलग 3 विजयांसह अंतिम फेरीत पोहोचतील. त्यानंतर अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत 1-1 जिंकतील. त्यानंतर अंतिम फेरीत पोहोचणारा संघ निव्वळ धावगतीच्या आधारावर ठरवला जाईल. भारताला फायनल खेळायची असेल तर पाकिस्तानला हरणे आवश्यक आहे.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 8 विकेट गमावून 173 धावा केल्या. रोहित शर्माने 72 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 19.5 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT