team india bowling bhuvneshwar kumar jasprit bumrah
team india bowling bhuvneshwar kumar jasprit bumrah sakal
क्रीडा

Ind vs Aus : भुवनेश्वर दुखरी नसच; टीम इंडियाची डेथ ओव्हरमध्ये पुन्हा धुलाई

Kiran Mahanavar

India vs Australia 3rd T20I Bowling : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी हैदराबादमध्ये तिसरा टी-20 सामना खेळला गेला. मालिकेतील या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 186 धावा केल्या, या सामन्यात भारतीय संघाची गोलंदाजी पुन्हा एकदा कमकुवत दिसून आली. कारण शेवटच्या षटकांमध्ये टीम इंडियाच्या प्रत्येक गोलंदाजाने जास्त धावा दिल्या, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला एवढी मोठी धावसंख्या उभारता आली.

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात वेगवान सुरुवात केली, मात्र मधल्या फळीत सततच्या धक्क्यांमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. एकवेळ असे वाटत होते की ऑस्ट्रेलियाचा डाव 160 पर्यंत जाईल, परंतु टीम डेव्हिड आणि डॅनिएल सॅम्स यांनी ऑस्ट्रेलियासाठी धावांचा पाऊस पाडला. अखेरच्या चार षटकांत भारताच्या एकूण 53 धावा यावरून भारतीय संघाच्या खराब गोलंदाजीचा अंदाज लावता येतो. यावेळी भुवनेश्वर कुमारने 19 वे षटक केले नसले तरी 18व्या षटकात 21 धावा दिल्या.

भारताकडून शेवटची 3 षटके तीन वेगवेगळ्या गोलंदाजांनी टाकली. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांनी टीम इंडियासाठी 18वी, 19वी आणि 20वी षटके टाकली, ज्यात भारताने 46 धावा दिल्या.

  • भुवनेश्वर कुमार : 3 षटके, 39 धावा - 1 विकेट

  • अक्षर पटेल : 4 षटके, 33 धावा - 3 विकेट

  • जसप्रीत बुमराह : 4 षटके, 50 धावा

  • हार्दिक पांड्या : 3 षटके, 23 धावा

  • युझवेंद्र चहल : 4 षटके, 22 धावा - 1 विकेट

  • हर्षल पटेल : 2 षटके, 18 धावा - 1 विकेट

हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवला. यासह भारताने 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव केला. तिसऱ्या सामन्यात भारताला विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे टीम इंडियाने 4 गडी गमावून पूर्ण केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 phase 4 Election Voting LIVE : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; महाराष्ट्रातील 14 गावांचं तेलंगणामध्ये मतदान

Lok Sabha Voting: मतदानाला सुरुवात होताच EVM मध्ये बिघाड, पुण्यासह, संभाजीनगरमध्ये मतदार खोळंबले

Chinese Spy: सायकलवरुन प्रवेश, मोबाईलमध्ये धक्कादायक फोटो अन्... गुप्तहेर असल्याचा संशय, चिनी नागरिक अटकेत

महिला लैंगिक शोषण प्रकरण : 'माजी पंतप्रधानांच्या नातवाला आणण्यासाठी SIT परदेशात जाणार नाही'; गृहमंत्र्यांची माहिती

Latest Marathi News Live Update : प्रज्वलला आणण्यासाठी एसआयटी परदेशात जाणार नाही - गृहमंत्री परमेश्वर

SCROLL FOR NEXT