Vinay Kumar esakal
क्रीडा

मुंबई इंडियन्सचा माजी क्रिकेटर बनला बाबा, छोट्या परीचे आगमन

भारताचा माजी मध्यमगती गोलंदाज विनय कुमार (Vinay Kumar) याच्या घरी छोट्या पाहुणीचे आगमन झाले आहे.

धनश्री ओतारी

भारताचा माजी मध्यमगती गोलंदाज विनय कुमार (Vinay Kumar) याच्या घरी छोट्या पाहुणीचे आगमन झाले आहे. पत्नी रिचा सिंग हिने छोट्या परीला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी विनयने सोशल मीडियावर आपल्या परीसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आहे.

आयपीएल मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या विनय कुमारने ट्वीटर खात्यावरून त्याच्या पत्नी आणि नवजात मुलीसोबतचा (Baby Girl) फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना ‘आज आम्हाला हे सांगण्यात खूप आनंद होतोय की, आमच्या आयुष्यात एक गोंडस मुलीचे आगमन झाले आहे. देवाने आम्हाला दिलेली ही सर्वात प्रेमळ भेट आहे." अशी खास कॅप्शन विनयने दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच विनय कुमारने बाप होणार असल्याची माहिती दिली होती.

विनय कुमार त्या भारतीय क्रिकेटपटूंपैकी एक आहे, ज्यांनी तिन्ही स्वरूपात भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. त्याने १ कसोटी सामना खेळला आहे, ज्यामध्ये १ विकेट घेतली आहे. हा एकमेव कसोटी सामना त्याने जानेवारी २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. तसेच त्याची वनडे कारकिर्द ३१ सामन्यांची राहिली आहे तर टी२० कारकिर्दीत फक्त ९ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याने ३८ विकेट्स घेतल्या आहेत. टी२० क्रिकेटमध्ये तो १० विकेट्सच घेऊ शकला आहे.

आयपीएलमध्ये विनय कुमार सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स संघाचा भाग राहिला आहे. याबरोबरच त्याने आणखीन २ संघांचे प्रतिनिधित्त्व केले आहे. तो मुंबईव्यतिरिक्त कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळला आहे. आयपीएलमध्ये १०५ सामने खेळताना त्याने १०५ विकेट्स घेतल्या आहेत. मात्र गेल्या ४ वर्षांपासून तो आयपीएलमध्येही खेळताना दिसलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT