क्रीडा

'मिशन WTC'; भारतीय संघ इंग्लंडला रवाना

नामदेव कुंभार

India Tour of England 2021 : मुंबईमध्ये विलगीकरणाचा कालावधी पुर्ण केल्यानंतर भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघ बुधवारी रात्री उशीरा इंग्लंडसाठी रवाना झाला आहे. इंग्लंडमध्ये पोहचल्यानंतर भारतीय संघ दहा दिवस विलगीकरणात राहणार आहे. त्यानंतर भारतीय संघाला सराव करण्याची परवानगी देण्यात आली. भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाल्याचं बीसीसीआयनं ट्विट करत सांगितलं आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि स्मृती मानधना आणि जसप्रीत बुमराह यांचे फोटो बीसीसीआयनं पोस्ट केले आहेत. भारतीय महिला आणि पुरुष संघ चार्टेड प्लेनने इंग्लंडला रवाना झाले आहेत. भारतीय संघाचा हा चार महिन्याचा दौरा आहे.

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघातील खेळाडूंना कुटुंबियांना सोबत नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. इंग्लंड सरकारने बीसीसीआयने केलेली मागणी मान्य केली आहे. भारतीय संघासोबत कुटुंबियदेखील इंग्लंडला रवाना झाले आहेत. खेळाडूंसोबत जाणाऱ्या त्यांच्या फॅमिली मेंबर्संना देखील कोरोनाच्या प्रोटॉकॉलचे पालन करावे लागणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जून रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (World Test Championship final) रंगणार आहे. इंग्लंडच्या मैदानातील मेगा फायनलनंतर भारतीय संघ इंग्लंड (England) विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

भारतीय संघ -( India's squad ): विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वाशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इंशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporators Not Reachable : विधानपरिषदेचे राजकारण तापलं! काँग्रेसचे ५० ते ६० नगरसेवक नॉट रीचेबल, भाजप आमदाराचा दावा

12 Years of PM Modi नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा पेट्रोल-डिझेलचे दर किती होते?

Blood Group Stroke Risk: ‘या’ रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा जास्त धोका? वाचा शास्त्रज्ञांचं नेमकं म्हणणं काय

Ganga Dussehra: वर्षातून एकदा होतो गंगा आणि नर्मदेचा संगम! काय आहे 'भयडा प्रसाद' आणि त्याची रेसिपी?

Mumbai: महापालिका जागा सील करू शकत नाही, थकीत मालमत्ता कर वसूलीवर न्यायालयाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT