team india dinesh karthik r ashwin and rohit sharma  sakal
क्रीडा

Team India T20 WC : डीके, अश्विनसह खुद्द रोहित शर्माचा फॉर्म डोकेदुखी मात्र...

सुपर-12 मधील 3 सामने जिंकूनही भारतीय संघाला मोठ्या चिंता लागुण राहिली आहेत ज्या नक्कीच...

Kiran Mahanavar

Team India T20 World Cup 2022 : टी-20 विश्वचषक 2022 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चांगली कामगिरी करत आहे. आता उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्की केले आहेत. भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान, नेदरलँड आणि बांगलादेश यांचा पराभव केला तर एकमेव पराभव दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला. टीम इंडियाला आता चॅम्पियन बनण्यासाठी सलग तीन सामने जिंकावे लागणार आहेत. मात्र सुपर-12 टप्प्यातील 4 पैकी 3 सामने जिंकूनही भारतीय संघाला काही मोठ्या चिंता लागुण राहिली आहेत, ज्या नक्कीच त्रासदायक आहेत. अशा स्थितीत नॉकआउट फेरीत संघावर भीतीचे ढग दाटू लागले आहेत.

टी-20 विश्वचषक 2022 मध्ये रोहित शर्माची बॅट पूर्णपणे शांत आहे. सध्याच्या स्पर्धेत त्याचा साथीदार केएल राहुल बांगलादेशविरुद्ध अर्धशतक झळकावून खराब फॉर्ममधून सावरताना दिसत आहे, पण रोहित स्वत: फलंदाज म्हणून त्याच्या लयीत दिसत नाही, ही टीम इंडियाची सर्वात मोठी चिंता आहे. रोहितने चार डावांमध्ये 108.82 च्या खराब स्ट्राइक रेटने केवळ 74 धावा केल्या आहेत. यादरम्यान रोहितने नेदरलँड्सविरुद्ध नक्कीच 53 धावा केल्या, पण त्या कमकुवत संघाविरुद्ध खेळपट्टीवर त्याला कोणतीही दहशत निर्माण करता आली नाही. या खेळीशिवाय उरलेल्या तीन डावात तो केवळ 4, 15 आणि 2 धावाच करू शकला.

अश्विन आणि दिनेश कार्तिकला पण या टी-20 विश्वचषक मध्ये काय खास करता आले नाही. 'फिनिशर कार्तिक' ऑस्ट्रेलियात खेळताणा दिसला नाही हे टीम इंडियाचे दुर्दैव म्हणता येईल. त्याने आतापर्यंत 4 सामन्यांच्या 3 डावात अनुक्रमे 1, 6 आणि 7 धावा केल्या आहेत. तर भारतीय संघ व्यवस्थापनाने अश्विनवर विश्वास दाखवला आणि लेग ब्रेक गुगली गोलंदाज युजवेंद्र चहलला आतापर्यंत प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले. पण अश्विनला 4 सामन्यात 35.33 च्या सरासरीने केवळ 3 विकेट घेता आल्या. यापैकी त्याचे 2 विकेट नेदरलँड्सविरुद्ध आले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने 4 षटकात 43 धावा दिल्या आणि फक्त एक विकेट मिळाली.

झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ सेमीफायनलमध्ये नक्की प्रवेश करेल, अशी अपेक्षा आहे. पण टीम इंडियाच्या या काही उणिवा नक्कीच चिंतेचे कारण बनत आहेत. स्पर्धेच्या या टप्प्यावर संघात खूप कमी बदल जबरदस्त असू शकतात. अशा परिस्थितीत उत्तम रणनीती आणि खेळाडूंच्या 100% योगदानानेच टीम इंडिया जेतेपदापर्यंत पोहोचू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT