team india playing 11 semi final in t20 world cup 2022 ind vs eng cricket news sakal
क्रीडा

IND vs ENG : पंत की कार्तिक, अक्षर की चहल? ही असले भारताची Playing-11

अॅडलेडचे मैदान ऑस्ट्रेलियातील इतर स्टेडियमच्या तुलनेने आकाराने लहान आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

India Playing-11 vs England T20 World Cup 2022 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज टी-20 विश्वचषक 2022 मध्ये उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता अॅडलेड ओव्हलवर इंग्लंड विरुद्ध हा सामना खेळवला जाईल. हा सामना कोणताही संघ जिंकेल, त्याचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये पाकिस्तानशी होईल. अशा स्थितीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा आपल्या दमदार प्लेइंग-11सह मैदानात उतरू इच्छित आहेत.

या महत्त्वाच्या सामन्यासाठी रोहित शर्मा आपल्या प्लेइंग-11 मध्ये काही महत्त्वाचे बदल करू शकतो. चाहत्यांसाठी सर्वात मोठा सस्पेन्स हा आहे की दिनेश कार्तिक यष्टिरक्षक म्हणून खेळणार की ऋषभ पंत? तसेच, या सामन्यात फिरकीपटू अक्षर खेळताना दिसणार की लेगस्पिनर युजवेंद्र चहलला संधी मिळू शकते, हे पाहावे लागेल.

भारतीय संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली असली, तरी हा संघ अजून स्थिर वाटत नाही. दिनेश कार्तिकला फिनिशर म्हणून संघात खेळवण्यात येत आहे, पण त्याला ठसा उमटवता आलेला नाही. अॅडलेडचे मैदान ऑस्ट्रेलियातील इतर स्टेडियमच्या तुलनेने आकाराने लहान आहे. तसेच येथील खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना पोषक असे वातावरण असेल. हेच डोळ्यांसमोर ठेवून डावखुरा फलंदाज संघात असायला हवा असे ठरवल्यास रिषभ पंतला भारतीय संघात संधी मिळू शकते, पण प्रशिक्षक राहुल द्रविड कार्तिकला वगळून पंतला खेळवण्याचा निर्णय घेतील का, हाही प्रश्न या वेळी निर्माण होत आहे.

तसेच अक्षर पटेल यानेही अद्याप शानदार कामगिरी केलेली नाही. त्यामुळे फिरकी गोलंदाजांना पूरक असलेल्या खेळपट्टीवर युझवेंद्र चहलला संधी द्यायला हरकत नाही, पण येथेही संघ व्यवस्थापन कोणता निर्णय घेतो हे पाहायला नक्कीच आवडेल.

भारतची सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग-11 : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक/ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल/युझवेंद्र चहल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

History! फुटबॉल खेळणाऱ्या देशाचे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पदार्पण; इटलीचा संघ T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी पात्र ठरला

IND vs ENG 3rd Test: शुभमन गिलने मोडला 'विराट' विक्रम! लोकेश राहुलच्या फिफ्टीने लढवला किल्ला, रिषभ पंत दुखापतीतून सावरला

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT