India Tour of New Zealand 2022 Full Schedule esakal
क्रीडा

T20 विश्वचषकानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर; 6 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर

सकाळ डिजिटल टीम

टीम इंडियाचं वेळापत्रक 2022 मध्ये खूपच व्यस्त असणार आहे.

India Tour of New Zealand 2022 Schedule : टीम इंडियाचं वेळापत्रक 2022 मध्ये खूपच व्यस्त असणार आहे. टीम इंडियाला टी-20 विश्वचषकापूर्वी अनेक देशांचा दौरा करायचाय. या स्पर्धेनंतर भारत लवकरच न्यूझीलंडला (New Zealand) जाणार आहे.

मंगळवारी न्यूझीलंड क्रिकेटनं आपलं देशांतर्गत वेळापत्रक जाहीर केलंय. यामध्ये भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेचाही समावेश आहे. भारताचा न्यूझीलंड दौरा 18 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, तर शेवटचा सामना 30 नोव्हेंबरला होणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाला (Team India) तीन सामन्यांची टी-20 मालिका, तसेच तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका (ODI Series) खेळायची आहे.

भारत-न्यूझीलंड दौऱ्याचं वेळापत्रक

  • पहिला T20 - 18 नोव्हेंबर

  • दुसरा T20 - 20 नोव्हेंबर

  • तिसरा T20 - 22 नोव्हेंबर

  • पहिली वनडे - 25 नोव्हेंबर

  • दुसरी वनडे - 27 नोव्हेंबर

  • तिसरी वनडे - 30 नोव्हेंबर

T20 विश्वचषक 2022 च्या तयारीसाठी न्यूझीलंडनं पाकिस्तान आणि बांगलादेशसोबत तिरंगी मालिका आयोजित करण्याचा निर्णय घेतलाय. बऱ्याच कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगी मालिका होणार आहे. ही मालिका 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, तर अंतिम सामना 14 ऑक्टोबरला होणार आहे. नोव्हेंबरमध्ये भारताविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळल्यानंतर, न्यूझीलंड फेब्रुवारी 2023 मध्ये मायदेशात इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यानंतर किवी संघाला श्रीलंकेचं यजमानपद भूषवायचंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT