Manika Batra  PTI
क्रीडा

ऑलिम्पिकमधील 'त्या' हट्टापायी मनिका बत्राला कारणे दाखवा नोटीस

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तिच्याकडून पदकाची आस होती. पण ...

सुशांत जाधव

भारताची स्टार टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा हिला टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाने मोठा दणका दिलाय. ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनिय कामगिरी करण्यात असमर्थ ठरलेल्या मनिका बत्राला टेनिस महासंघाकडून नोटीस बजावण्यात आलीये. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तिच्याकडून पदकाची आस होती. पण तिसऱ्या फेरीतच तिचा प्रवास संपुष्टात आला. ऑलिम्पिक स्पर्धेतील सामन्यावेळी तिने राष्ट्रीय प्रशिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यास साफ नकार दिला होता. याच कारणावरुन तिला नोटीस बजावण्यात आले असून त्यामागचे कारण काय याचे स्पष्टीकरण तिला द्यावे लागणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक स्पर्धेत कठोर नियमावलीचे पालन करण्यात येत आहे. मनिकाचे वैयक्तिक कोच असणारे सन्मय परांजपे यांना सामन्यावेळी तिच्यासोबत राहण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर मनिकाने टोकाचा निर्णय घेतला होता. तिने राष्ट्रीय कोच सौम्यदीप रॉय यांच्याकडून कोणतेही मार्गदर्शन घेणार नसल्याची भूमिका घेतली. याची किंमत तिला पराभवाने चुकवावी लागली. तिच्या हट्टी भूमिकेवर टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाने (TTFI त्यावेळीच नाराजी व्यक्त केली होती. कार्यकारी मंडळाच्या बैठकीत मनिकाच्या वर्तणुकीसंदर्भात तिला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारतीय टेबल टेनिस संघाचे राष्ट्रीय कोच सौम्यदीप रॉय यांनी 2006 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. त्यांना अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या 4 सदस्यीय भारतीय टेबल टेनिस संघाचे ते एकमेव कोच होते. पण त्यांचे मार्गदर्शन घेण्यास मनिका बत्राने नकार दिला होता. वैयक्तिक कोच आपल्यासोबत असावेत, अशी मागणी तिने केली होती. ही मागणी मान्य न झाल्याने तिने राष्ट्रीय प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन न घेण्याची कठोर भूमिका घेतली होती.

मनिका बत्रा वैयक्तिक कोच परांजपे यांच्यासह टोकियोला गेली होती. पण त्यांच्यासोबत केवळ सराव करण्याचीच परवानगी तिला देण्यात आली होती. पण तरीही सामन्याच्या वेळी वैयक्तिक कोचला स्टेडियममध्ये परवानगी न दिल्याने तिने राष्ट्रीय प्रशिक्षकांचे मार्गदर्शन नाकारले होते. टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाने याप्रकरणी कठोर पावले उचलली आहेत. मिनिका बत्रा यावर काय स्पष्टीकरण देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० एकरावरील सोयाबीन उगवलेच नाही! सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील १२ शेतकऱ्यांच्या ‘कृषी’कडे तक्रारी; पावसाअभावी ८ तालुक्यांत पेरणी खोळंबली, १५ दिवसांनंतर दुबार पेरणीचे संकट

आजचे राशिभविष्य - 15 जुलै 2026

Fifa World Cup Semi Final: फ्रान्स अन् एम्बाप्पेची मक्तेदारी संपुष्टात! स्पेनची बाचवभींत ओलांडण्यात अपयशी, 'Tiki-Taka' ने कमाल दाखवली

Pune Crime : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीचे ‘पुणे कनेक्शन’; ‘एटीएस’कडून ६६ जणांची चौकशी, काही संशयित ताब्यात

Bidkin News : बिडकीनमधून दोन अल्पवयीन सख्खे भाऊ बेपत्ता; पोलिसांची रात्रभर शोधमोहीम, नागरिकांना आवाहन

SCROLL FOR NEXT