mirabai chanu medal tokyo twitter
क्रीडा

Fact Check : मीराबाई चानूचं सिल्वर होणार गोल्ड?

मीराबाई चानूची चंदेरी कामगिरी गोल्डन रुपात बदलणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे.

सुशांत जाधव

Tokyo Olympics-2020 : जगातील मानाच्या स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून देणाऱ्या मीराबाई चानू सध्या चांगलीच चर्चेत आहे. वेटलिफ्टिंगमध्ये तिने 202 किलो वजन उचलत रौप्य पदकाची कमाई केली होती. देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या चानुवर कौतुकाचा वर्षाव सुरु असताना तिला सुवर्णाची संधी निर्माण झाल्याची चर्चो सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे. 49 किलो वजनी गटात मीराबाई चानूने स्नॅचमध्ये 87 किलो तर क्लीन आणि जर्कमध्ये 115 किलो वजन असे एकूण 202 किलो वजन उचलत दुसरा क्रमांक मिळवला होता. या गटात चीनच्या झीयू हौ (Zhihui Hou) हिने 210 किलो वजन उचलत सुवर्ण पदकाची कमाई केलीये. इंडोनेशियाची विंडी कँटिका आइशाह हिने (194 किलो) कांस्य पदक मिळवले होते. (Tokyo Olympics Silver medalist Mirabai Chanu Could be Awarded the Gold Medal Check Fact)

मीराबाई चानूची चंदेरी कामगिरी गोल्डनमध्ये बदलणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगताना दिसते. अमेरिकेच्या काइल बेस नावाच्या नागरिकाने केलेल्या एका ट्विटमुळे या चर्चेला उधाण आले आहे. वेटलिफ्टिंगच्या 49 किलो वजनी गटातील सुवर्ण पदक विजेत्या चीनी खेळाडूची डोपिंग टेस्ट होणार असल्याचे ट्विट त्यांनी केले. या ट्विटमुळे क्रीडा जगतात एकच खळबळ उडालीये. चीनी खेळाडूने प्रतिबंधित पदार्थ सेवन केल्यामुळे तिचे पदक रद्द होऊ शकते आणि याचा फायदा भारतीय महिला वेटलिफ्टर चानूला होऊ शकतो, असे बोलले जात आहे.

काय आहे चीनी खेळाडूच्या डोपिंग टेस्टमागची कहाणी

ऑलिम्पिक स्पर्धेतील जवळपास 5 हजार खेळाडूंची डोपिंग टेस्ट झालीये. झीयू हौ त्यातीलच एक खेळाडू आहे. तिच्यावर काही आरोप झालाय आणि त्यानंतर डोपिंग चाचणीची वेळ तिच्यावर आलीये, असा कोणताही प्रकार झाल्याचे कोणतेही अधिकृत वृत्त समोर आलेले नाही. ऑलिम्पिकमध्येच नाही तर कोणत्याही स्पर्धेत पदक विजेता खेळाडू डोपिंगमध्ये दोषी आढळला तर रनरअप खेळाडूला विजेता म्हणून घोषीत केले जाते. पण डोपिंगचा अधिकृत रिपोर्टसमोर येण्यापूर्वी यासंदर्भात कोणताही दावा करता येणार नाही.

मीराबाई चानूनं 21 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारताला वेटलिफ्टिंग प्रकारात पदकाची कमाई करुन दिलीये. 2000 मध्ये सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत कर्णम मल्लेश्वरीने कांस्य पदक जिंकले होते. पीव्ही सिंधूनंतर ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकणारी मीराबाई चानू भारताची दुसरी महिला खेळाडू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: डीआरआयची मोठी कारवाई! २८ कंटेनर अन् ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त, मुंबईत खळबळ

Palghar News: विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! जिल्हा परिषदेतील शिक्षकांची १८ टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

Baramati News : कारखेल येथे वीजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू, गावात शोककळा

Nagpur News: तीन एकर जागेवर उभारणार अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र; प्राण्यांसाठी असणार सर्व सोयी सुविधा उपलब्ध

SCROLL FOR NEXT