U19 World Cup 2024 esakal
क्रीडा

U19 World Cup 2024 : पाकिस्तानचं काही खरं नाही; सेमी फायनलमध्ये दोन भारतीयांच कडवं आव्हान

U19 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाच्या संघात दोन पंजाबी खेळाडू, एक आहे गिलचा चाहता तर दुसरा...

अनिरुद्ध संकपाळ

U19 World Cup 2024 : भारतीय संघ 19 वर्षाखालील वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहचला आहे. दुसरा सेमी फायनल सामना हा पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असून या सामन्यातील विजेता भारतासोबत 11 फेब्रुवारीला विजेतेपदासाठी भिडणार आहे.

दरम्यान, आज सुरू असलेल्या पाकिस्तान - ऑस्ट्रेलिया सामन्यात भारतीय वंशाचे दोन खेळाडू पाकिस्तानसमोर कडवं आव्हान उभारणार आहेत. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ हे चांगल्या फॉर्ममध्ये असून सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा होती. मात्र नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा निम्मा संघ 79 धावात गारद केला.

हरजस सिंग आणि हरकीरत बाजवा पाकिस्तानला भिडणार

ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षाखालील संघात भारतीय वंशाचे दोन खेळाडू खेळत आहेत. हरजस सिंग आणि हरकीरत बाजवा असं या दोन खेळाडूंच नाव आहे. दोघंही पंजाबी असून सध्या ऑस्ट्रेलियाकडून खेळत आहेत. दोघंही अष्टपैलू खेळाडू आहेत. हरजस सिंग हा डावखुरा फलंदाज असून उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. तर हरकीरत बाजवा हा ऑफ स्पिन आणि उजव्या हाताने फलंदाजी करतोय.

बाजवाचे वडील टॅक्सी ड्रायव्हर

बाजवा हा मेलबर्नचा आहे. त्याचे वडील हे टॅक्सी ड्रायव्हर आहेत. हरजस सिंग हा सिडनीचा असून त्याचे वडील हे ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये काम करतात.

हरजसचे वडील इंद्रजीत सिंह हे पंजाब राज्याकडून बॉक्सिंग खेळले असून राज्य स्तरावर त्यांनी चॅम्पियनशिप पटकावली होती. हरजसची आई अविंदर कौर या अॅथलॅटिक्सपटू होत्या. त्यांनी लांब उडीत राज्यस्तरापर्यंत मजल मारली होती.

बाजवा दुसऱ्यांदा खेळतोय U19 चा वर्ल्डकप

मोहालीत जन्म झालेल्या बाजवा 2022 मध्ये वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलिया क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झाली होती. बाजवाचे वडील 2012 मध्ये ऑस्ट्रेलियात आले.

बाजवा हा शुभमन गिलचा चाहता आहे. गिल देखील 19 वर्षाखालील विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य होता. सध्या तो भारतीय संघाकडून खेळतोय. त्याच्याकडे भारताचा पुढचा विराट कोहली म्हणून पाहिलं जात आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT