ronaldo
ronaldo 
क्रीडा

'त्या' बाटल्यांना हात नका लावू, UEFA ने फुटबॉलपटूंना बजावलं

दीनानाथ परब

जिनेव्हा: सध्या सुरु असलेली युरोपियन चॅम्पियशिप स्पर्धा फुटबॉलबरोबरच (Euro cup) वादांमुळेही चर्चेत आहे. याची सुरुवात केली ते पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने. (ronaldo) त्याने त्याच्यासमोर ठेवलेली कोका-कोलाची बॉटल उचलून दूर ठेवली. रोनाल्डो समोर कोका-कोलाची बॉटल (coca cola bottle) पाहून नाराज झाल्याचं दिसले. रोनाल्डो नंतर फ्रान्सचा स्टार प्लेयर पॉल पोगबा आणि मॅन्युल लोकाटीलीन यांनी सुद्धा तोच कित्ता गिरवला. (UEFA asks Euro 2020 teams to stop removing sponsor bottles)

त्यांनी सुद्धा पत्रकार परिषद सुरु होताना, त्यांच्यासमोर ठेवलेल्या सॉफ्ट ड्रिंक्सच्या बॉटल उचलून कॅमेऱ्याच्या नजरेपासून दूर ठेवल्या. युरो कप स्पर्धेच्या पत्रकार परिषदांमध्ये सुरु झालेल्या या ट्रेंडची UEFA ने आता गंभीर दखल घेतली आहे. UEFA ने २४ संघातील सर्वच खेळाडूंना स्पॉनसर्स म्हणजे प्रायोजकांनी पत्रकार परिषदांमध्ये पद्धतशीरपणे ठेवलेल्या या बॉटल्सना हात लावू नका, असे सांगितले आहे.

या विषयासंदर्भात UEFA ने संघांसोबत चर्चा केली आहे, असे युरो २०२० स्पर्धेचे संचालक मार्टिन काललेन यांनी सांगितले. प्रायोजकांकडून मिळणार उत्पन्न स्पर्धा आणि युरोपियन फुटबॉलसाठी आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचा स्टार प्लेयर पोग्बा मुस्लिम आहे. तो मद्यपान करत नाही. युरो २०२० स्पर्धेचे हेनीकेन अधिकृत प्रायोजक आहे. पोग्बाने त्याच्यासमोर ठेवलेल्या हिरव्या रंगाच्या बॉटलवर आक्षेप घेतला. UEFA ने प्रायोजकांना जी आश्वासन दिली आहेत, त्याचे पालन करणे आवश्यक आहे, असे काललेन यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT