Italy vs Austria  Twitter
क्रीडा

एक्स्ट्रा टाईमपर्यंत ऑस्ट्रिया लढली; अखेर इटली 2-1 ने जिंकली

पहिल्या 15 मिनिटांच्या हाफमध्ये इटलीने दोन गोल डागत क्वार्टर फायनलमधील आस जागवली.

सुशांत जाधव

UEFA Euro 2020 : युरो कप स्पर्धेतील नॉक आउट राउंडमधील लंडन येथील वेब्ली स्टेडियमवर रंगलेल्या (Wembley Stadium in London) दुसरा सामना अपेक्षेपेक्षा रंगतदार झाला. कमकुवत वाटणाऱ्या ऑस्ट्रियाने स्पर्धेतील प्रबळ दावेदार मानला जाणाऱ्या इटलीला तगडी फाईट दिली. पहिल्या 90 मिनिटात ऑस्ट्रियाने सामना गोलशून्य बरोबरीत रोखला. यात त्यांनी एक गोलही डागला. पण ऑफ साईडमुळे त्यांना आघाडी मिळाली नाही. अखेर सामना 30 मिनिटाच्या एक्स्ट्रा टाईममध्ये पोहचल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांच्या हाफमध्ये इटलीने दोन गोल डागत क्वार्टर फायनलमधील आस जागवली. अखेरच्या क्षणात ऑस्ट्रियाने एक गोल डागला. इटलीने सामना 2-1 असा जिंकत शेवटपर्यंत कडवी झुंज देणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या स्पर्धेतील प्रवासाला ब्रेक लावला.

या सामन्यात 11 मॅच आणि 1169 मिनिटानंतर इटलीने प्रतिस्पर्ध्याकडून गोल खाल्ला. सामन्यातील एक्स्ट्रा टाईममधील 94 व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून आलेल्या फेडरिको सिजाने (Federico Chiesa) केलेल्या अप्रतिम गोलने इटलीली दिलासा दिला. त्यानंतर बदली मॅटिओ पेसिना (Matteo Pessina) याने 105 व्या मिनिटाला दुसरा गोल डागत झुंजारु ऑस्ट्रियाला दबावात टाकले. अखेरच्या काही मिनिटांचा खेळ बाकी असताना सासा कलाज्ज़िक (sasa kalajdzic) याने कॉर्नरची मिळालेली संधी अप्रतिम हेडरने गोलमध्ये बदलली. पण हा गोल ऑस्ट्रियाचा स्पर्धेतील प्रवास कायम ठेवण्यास पुरेसा ठरला नाही. क्वार्टर फायनमध्ये इटलीसमोर बेल्जियम आणि पोर्तुगाल यांच्यातील विजेत्याचे तगडे चॅलेंज असणार आहे.

पहिल्या दोन हाफमध्ये ऑस्ट्रियाच्या संघाने कमालीची ऊर्जा दाखवली. एका बाजूला इटलीने संघात चार बदल केले. दुसरीकडे पहिल्या अकरा खेळाडूनिशीच ऑस्ट्रियाचा संघ खेळताना दिसला. शेवटच्या मिनिटाला एलेसेंड्रो शोपफीला स्नायू दुखापतीचा त्रास झाल्यामुळे नाइलाजास्तव ऑस्ट्रिया संघाला एक बदल करावा लागला. त्याची जागा बॉमगार्टनर याने घेतली. 90 मिनिटांच्या खेळानंतर सामना गोलशून्य बरोबरीत राखल्याने ऑस्ट्रियाचे चाहते कोच फ्रेंको फोडा यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद पाहायला मिळाला. इटलीली गोलशून्य रोखत त्यांनी थोड्या काळासाठी का होईना तगड्या संघाला टेन्शनमध्ये आणले होते.

30 मिनिटांच्या एक्स्ट्रा खेळापूर्वी एका बाजूला इटलीचे कोच रॉबर्टो मॅन्सिनी रणनिती आखताना दिसले. दुसरीकडे आतापर्यंत खेळला असा सल्ला देताना ऑस्ट्रियाच्या ताफ्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. इटलीच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होते. पहिल्या 15 मिनिटाच्या हाफमध्येच इटली यातून बाहेर पडले. सामना जिंकून त्यांनी आपल्यातील धमक दाखवत स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यात यश मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT