Spain vs Sweden
Spain vs Sweden  UEFA Euro Twitter
क्रीडा

स्वीडनच्या गोलीनं जिंकलं; स्पेनला गोलशून्य बरोबरीत रोखलं

सुशांत जाधव

UEFA Euro 2020 Spain vs Sweden : युरो चषकातील दहाव्या सामन्यात स्विडनने दोन वेळच्या चॅम्पियन स्पेनला रोखून दाखवले. घरच्या मैदानात खेळणाऱ्या स्पेनने पहिल्या हाफपासून आक्रमक खेळ केला. स्वीडनची बचाव फळी आणि जिमनॅस्टिकचा छंद जोपसणारा स्विडनचा गोलकिपर रॉबिन ओल्शे यांनी सर्वोत्तम कामगिरी करत मोक्याच्या क्षणी अप्रतिम भूमिका बजावली. त्यांनी जबरदस्त खेळ करत स्पेनला गोल करण्यापासून रोखले. परिणामी आतापर्यंत झालेल्या सामन्यातील पहिला सामना गोलविरहित ड्रॉ राहिला. (UEFA Euro 2020 Spain vs Sweden play to 0-0 draw)

युरोच्या इतिहासात सर्वाधिक पास करण्याचा विक्रम (700+) आणि 70+ टक्के पेक्षा अधिक काळ चेंडू आपल्याकडे ठेवूनही स्पेनला गोल करता आला नाही. स्पेनला गोलशून्य बरोबरीत रोखून स्वीडनने मिळवलेला गुण हा त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असाच आहे. याशिवाय स्वीडनच्या कमालीच्या खेळीने ग्रुप ईमध्ये स्लोवाकियाला मोठा फायदा झालाय.

स्पेन आणि स्वीडन यांच्यातील सामन्यानंतर स्पेन गुणतालिकेत टॉपला असेल, असा अंदाज बांधण्यात आला होता. पण या सामन्यात स्पेनला एकही गोल न करता आल्याने पोलंडला 2-1 अशा फरकाने पराभूत करणाऱ्या स्वोकियाने गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. स्पेन, स्वीडन प्रत्येकी एका गुणासह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असून पोलंड तळाला आहे.

या लढतीत स्पेनने पहिल्या हाफमध्ये अनेक संधी दवडल्या. 17 शॉटमध्ये त्यांनी केवल 5 शॉट हे ऑन टार्गेट लागले. दुसरीकडे स्वीडन 4 पैकी एक शॉट्स ऑन टार्गेट होता. जे दोन्ही संघाच्या गोलीने सुरक्षितपणे अडवले. लढतीमध्ये स्पेनने 86 टक्के पजेशन (चेंडूवरील नियंत्रण) आपल्याकडे ठेवले. तर केवळ 14 पजेशन राखण्यात स्वीडनला यश आले. सामन्यावर वर्चस्व राखूनही स्पेनला गोल करता आला नाही. स्वीडनच्या पास पेक्षा स्पेनची पासिंग ही सर्वोत्तम दिसली. स्पेनने सामन्यादरम्यान 6 कोर्नर घेतले. पण सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2024: केएल राहुलला डच्चू, तर हार्दिक उपकर्णधार; वर्ल्ड कपसाठी कसं भारतीय संघात कसं आहे खेळाडूंचं संमिश्रण

Latest Marathi News Live Update : मनीष सिसोदियांना झटका! कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन

Dombivli News : डोंबिवलीत महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन; उमेदवार वैशाली दरेकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

Kiran Mane: उज्ज्वल निकम अन् एस.एम. मुश्रीफांच्या पुस्तकातले सिक्रेट्स; मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत किरण मानेंनी शेअर केली पोस्ट

Rajan Patil : मोहोळ तालुक्याचा दुष्काळ हटविण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला ज्यादा मताधिक्य देण्याचा निर्धार - राजन पाटील

SCROLL FOR NEXT