Ukraine Liudmyla Liashenko Won Gold in Beijing Winter Paralympics
Ukraine Liudmyla Liashenko Won Gold in Beijing Winter Paralympics  esakal
क्रीडा

रशियाने घर उद्धवस्त केलेल्या युक्रेनच्या खेळाडूने देशासाठी जिंकले सुवर्ण

सकाळ डिजिटल टीम

रशियाने युक्रेनवर आक्रमण (Russia Ukraine War) करत त्यांच्या अनेक शहरांवर बॉम्बचा वर्षाव केला होता. रशियाच्या या बॉम्बवर्षावात युक्रेनच खारकीव्ह (Kharkiv) हे शहर पूर्णपणे बेचिराख झाले आहे. याच शहरात युक्रेनच्या पॅरोलिंम्पिकपटू लियुदमयला लियाशेन्कूचे (Liudmyla Liashenk) घर होते. ते काही दिवसांपूर्वीच रशियाच्या बॉम्ब हल्ल्यात उद्धवस्त झाले. मात्र डोक्यावरचे छप्पर हिरावल्या गेलेल्या या दिव्यांग खेळाडूंने आपल्या देशासाठी सुवर्णपदक जिंकून दिले. लियाशेन्कूने बिजिंग विंटर ऑलिम्पिकमध्ये (Beijing Winter Paralympics) बायथ्लॉनमध्ये सुवर्णपदक जिंकले.

युक्रेनच्या 28 वर्षाच्या या . लियाशेन्कूने आपले हे सुवर्णपदक युक्रेनच्या लष्कराला आणि आपल्या कुटुंबियांना समर्पित केले. ती म्हणाली 'मी हे सुवर्णपदक युक्रेनच्या नागरिकांना, आमचे संरक्षण करणाऱ्या लष्कराला (Ukraine Army) माझ्या कुटुंबियांना समर्पित करत आहे.' लियाशेन्कूने शुक्रवारी सुवर्णपदक जिंकून युक्रेनची सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साजरी केली. शुक्रवारीच ओलेक्झांडर काझिक आणि ओकसाना शायश्कोव्हा यांनी देखील युक्रेनसाठी सुवर्णपदक जिंकले होते. शायश्कोव्हाने (Oksana Shyshkova) तर युक्रेनसाठी बिजिंग विंटर पॅरोलिंम्पिकमध्ये तब्बल 5 पदके पटकावली आहेत. यात तीन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांचा समावेश आहे. तिने बायथ्लॉन, क्रॉस कंट्री आणि स्किईंगमध्ये ही कामगिरी केली आहे.

ती म्हणाली की 'आम्ही आमच्या देशाच्या सन्मानाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहोत. हीच गोष्ट आमच्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यामुळेच आम्ही आमची सर्वोत्तम कामगिरी करू शकलो. आमच्या यशाचे तेच सिक्रेट आहे.' युक्रेन सध्या बिजिंग विंटर पॅरालिंम्पिकमध्ये पदक तालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत 25 पदके जिंकली आहेत. यात विक्रमी 9 सुवर्णपदकांचा समावेश आहे. यापूर्वी 2006 ला ट्युरीन विंटर पॅरालिंम्पिक स्पर्धेत युक्रेनने 25 पदकांची कमाई केली होती. त्यात 7 सुवर्ण पदकांचा समावेश होता.

दरम्यान, युक्रेनने जवळपास जवळपास 25 लाख लोकांनी युक्रेन सोडल्याचा अंदाज वर्तवला आहे. यातील बहुतांश लोकं ही शेजारील पोलंड देशात गेली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT