FIFA Russia World Cup  Sakal
क्रीडा

FIFA ची आणखी एक किक; रशियाचे वर्ल्ड कप दरवाजे होणार बंद?

सकाळ डिजिटल टीम

युरोपीयन फुटबॉल संघानंतर आता फिफाने रशियाला आणखी एक दणका देण्याची तयारी सुरु केली आहे. चॅम्पियन्स लीग फायनलचे यजमानपद गमावलेल्या रशियाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे वर्ल्ड कपसह आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे दरवाजे बंद होणार आहेत. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती आटोक्यात येणार नाही तोपर्यंत रशियन फुटबॉल संघाला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यासंदर्भात चर्चा झाल्या समजते. (FIFA in Advanced discussions to expel Russia from World Cup reports)

AFP ने सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनसोबतच्या वादावर तोडगा निघला नाही तर रशियन फुटबॉलला मोठा फटका बसू शकतो. फिफाने यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. रशियन फुटबॉल संघ आणि पोलंड यांच्यात 24 मार्चला वर्ल्ड कप पात्रता फेरीतील प्ले ऑफच्या सेमी फायनल नियोजित आहे. याआधी फिफा रशियाला दणका देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

जगातील अनेक देश युद्धजन्य परिस्थितीत युक्रेनला समर्थ देत आहेत. युद्ध नको शांती हवी, असे आवाहन जगभरातील अनेक राष्ट्रांनी रशियाला केले होते. पण पुतिन यांनी या सर्वांच्या आवाहनाकडे कानाडोळा करत आपला मनसुबा खरा करण्याच्या दिशेने पावले उचलली. रशियाच्या आक्रमक भूमिकेनंतर वेगवगळ्या पातळीवर जागतिक स्तरावरुन त्यांची कोंडी केली जात आहे. क्रीडा जगतातही याचे सावट दिसून येत आहे.

युक्रेन विरुद्ध युद्ध छेडल्यामुळे याआधीत त्यांनी चॅम्पियन्स लीग (Champions League) फुटबॉल (Football) स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे यजमान पद गमावले. या स्पर्धेच्या माध्यमातून 18 वर्षानंतर एखादा मोठा इवेंट् रशियात पार पडणार होता. सेंट पिटर्सबर्ग (St Petersburg) येथे होणारा सामना आता फ्रान्समधील पॅरिसला (Paris) स्थलांतरित करण्यात आला आहे. याशिवाय फॉर्म्युला वन शर्यतही रद्द झाली. आंतरराष्ट्रीय जूडो असोसिएशनने व्लादिमिर पुतिन यांच्याकडून पदभारही काढून घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dindori : कार विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू; रस्त्याच्या मधोमध असलेली विहीर बुजवण्यास सुरुवात, मालकावर गुन्हा दाखल

Fake Caste Certificate: बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण! २० वर्षांनी गुन्हा दाखल, पण वेळ निघून गेली

'या' मराठी अभिनेत्रीने 19 व्या वर्षी केलेलं लग्न; परपुरुषासोबत परदेशात गेली पळून पण रस्त्यावर राहण्याची आली वेळ

Mumbai News: मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार

Latest Marathi News Live Update : बनावट जात प्रमाणपत्रावर निवडणूक जिंकणाऱ्या माजी नगरसेवकावर २० वर्षांनी गुन्हा

SCROLL FOR NEXT