Venkatesh Prasad Health Update About Himself After His Slim Body Photo Gone Viral  esakal
क्रीडा

Venkatesh Prasad : प्रसादचा बारीक झालेला फोटो पाहून फॅन्स चिंतेत; प्रसाद म्हणाला मी...

अनिरुद्ध संकपाळ

Venkatesh Prasad : भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद सोशल मीडियावर चांगला अॅक्टिव्ह असतो. त्याने भारताच्या अमृत मोहत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त सोशल मीडियावर हातात तिरंगा घेतलाले फोटो शेअर केला. मात्र हा फोटो पाहून त्याचे चाहते चांगलेच चिंतेत पडले. या फोटोत व्यंकटेश प्रसाद खूप बारीक झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे चाहते सोशल मीडियावर त्याच्या तब्येतीविषयी विचारणा करू लागले होते. (Venkatesh Prasad Health Update)

व्यंकटेश प्रसादने सोशल मीडियावर तिरंग्यासोबत आपला फोटो शेअर करत सर्वांना स्वांतत्र्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. व्यंकटेश प्रसादने या फोटोला 'स्वातंत्र्य विचरांचे, शब्दांमधला विश्वास आणि आत्म्यात गर्व. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला अभिवाद करा.' असे कॅप्शन दिले.

हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना व्यंकटेश प्रसाद खूप बारीक झाल्याचे जाणवले. त्यामुळे चाहत्यांनी त्याच्या तब्येतीविषयी विचारणा करण्यास सुरूवात केली. त्याला तब्येतीची काळजी घेण्याचा आवाहन केले. दरम्यान, व्यंकटेश प्रसादने एका चाहत्याला उत्तर दिले.

प्रसाद म्हणाला, 'मी एकदम ठणठणीत आहे. मी दीर्घ काळासाठी साधना करत होतो. तसेच तिरूवंदमलई मे अरूणाचल पर्वतावर गिलीवलम (परिक्रमा) करत होतो. मी लो डायेटवर होते. त्यामुळे माझे वजन कमी झाले आहे. मात्र मला उर्जा मिळाल्यासारखे वाटते. काही काळातच माझे वजन पुन्हा वाढेल. आपुलकीने विचारणा केल्याबद्दल आभारी आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT