Venkatesh Prasad tweet over Wriddhiman Saha controversy  esakal
क्रीडा

'मोठ्या खेळाडूंना मस्का लावलेलं आवडतं' व्यंकटेश प्रसादचे साहा प्रकरणावरून वक्तव्य

अनिरुद्ध संकपाळ

भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने (Venkatesh Prasad) वृद्धीमान साहाला पत्रकाराने दिलेल्या धमकी प्रकरणावरून (Wriddhiman Saha controversy) एक मोठे वक्तव्य केले आहे. त्याने ट्विट करून भारतीय संघातील (Indian Cricket Team) काही खेळाडूंना चिमटा देखील काढला. वृद्धीमान साहाने एका पत्रकाराबरोबर झालेले चॅट सार्वजनिक करत त्याने धमकी दिल्याचा दावा काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावरून भारतीय क्रिकेट वर्तुळात मोठा गदारोळ माजला आहे.

दरम्यान, भारताचे माजी गोलंदाज प्रशिक्षक व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विटरवरून याबाबत आपले मत व्यक्त केले. या ट्विटमध्ये त्यांनी भारतीय संघातील काही खेळाडूंना मस्का लावलेला आवडतो. त्यामुळेच असे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे कोणाला किती जवळ करायचे याचे भान ठेवले पाहिजे असे ते म्हणाले.

व्यंकटेश प्रसादने ट्विट केले की, 'खेळाडूंनी अशा आगाऊ पत्रकारांना अनावश्यक जवळ येण्याची संधी ने देणे देखील गरजेचे आहे. खेळाडूंना कोणाला किती जवळ येऊ द्यायचे कोणत्या मर्यादेपर्यंत त्यांना माहिती द्यायची याचे भान असले पाहिजे. मला भीती आहे की काही मोठ्या खेळाडूंमध्ये याचे भानच नसते कारण त्यांना मस्का (Buttering) लावलेला आवडतो. #Saha'

व्यंकटेश प्रसादने याला जोडून दुसरे ट्विट केले. त्यात तो म्हणतो की, 'काही असेही क्रीडा पत्रकार आहेत ते खेळावर प्रचंड प्रेम करतात. ते खेळाडूंचा आदरही करतात आणि त्यांच्याशी एका मर्यादेत राहूनच संवाद साधतात. असे फार थोडेच आहेत. नाहीतर काही जण मोठ्या खेळाडूच्या जवळ असल्याचा फायदा घेत कोणत्याही माहितीच्या आधार न घेता माल मसाला छापतात.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT