Vijay Hazare Trophy esakal
क्रीडा

मध्य प्रदेशच्या 'सुपर सेव्हर' फिल्डिंगचा Video पाहिलात का?

अनिरुद्ध संकपाळ

राजकोट : देशांतर्गत क्रिकेट (Cricket) मधील महत्वाची समजली जाणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीची (Vijay Hazare Trophy) सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील (Team India) काही युवा खेळाडू आपले संघातील स्थान पक्के करण्यासाठी चांगलीच मेहनत घेताना दिसत आहेत. त्यामुळे विजय हजारे ट्रॉफीतील(Vijay Hazare Trophy) फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा स्तरही चांगलाच उंचावला आहे. असाच क्षेत्ररक्षणाचा उत्तम नमुना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) संघाने चंदीगडविरुद्धच्या (Chandigarh) सामन्यात सादर केला.

मध्य प्रदेशने प्रथम फलंदाजी करत ३३२ धावांचा डोंगर उभारला होता. मध्य प्रदेशचा स्टार खेळाडू व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत धडाकेबाज दीडशतकी ( १५१ ) धावांची खेळी केली. मात्र चंदीगडच्या मनन वोरा (Manan Vohra) (१०५) आणि अंकित कौशिक (Ankit Kaushik) (१११) यांनी धडाकेबाज शतकी खेळी करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला.

दरम्यान, चंदीगडला विजयासाठी ९ चेंडूत २३ धावांची गरज होती. त्यावेळी मध्य प्रदेशच्या क्षेत्ररक्षकांनी ४८ व्या षटकातल्या तिसऱ्या आणि चौथ्या अशा पाठोपाठच्या दोन चेंडूवर दोन अप्रतिम षटकार रोखले. या खेळाडूंनी बाऊंडरी लाईवर केलेल्या सुपर सेव्हर फिल्डिंगच्या जोरावर चंदीगडला ३२६ धावात रोखण्यात मध्य प्रदेशला यश आले. या सुपर सेव्हर फिल्डिंगचा व्हिडिओ (Super Saver Fielding Video) सध्या सोशल मीडियावर व्हारल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT