Mohd-Siraj-Video 
क्रीडा

Video: सिराजच्या उत्तराने इंग्लंडच्या फॅन्सची झाली बोलती बंद

विराज भागवत

'स्कोअर काय झाला' असा सिराजला चाहत्याने प्रश्न केला अन्...

Ind vs Eng 3rd Test: भारतीय संघासाठी तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस फारसा चांगला ठरला नाही. भारताचा संपूर्ण संघ ७८ धावांवर तंबूत परतला. रोहित शर्मा (१९) आणि अजिंक्य रहाणे (१८) यांच्याव्यतिरिक्त कोणालाही दोन आकडी संख्या गाठता आली नाही. राहुल, विराट, पुजारा, पंत, जाडेजा सर्वच फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर इंग्लंडच्या सलामी जोडीने मात्र दमदार कामगिरी केली. दिवसभराचा खेळ संपेपर्यंत रॉरी बर्न्स (५२*) आणि हसीब हमीद (६०*) दोघांनी १२० धावांची नाबाद भागीदारी केली. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्यासोबत एक मजेशीर गोष्ट घडली. त्याला एक प्रश्न विचारण्यात आला आणि त्यावर त्याच्या उत्तराने इंग्लंडच्या चाहत्यांची बोलतीच बंद झाली.

नक्की काय घडलं?

सिराज सीमारेषेवर फिल्डिंग करत होता. त्यावेळी इंग्लंडच्या सलामीवीरांनी शतकी सलामी दिली होती. सिराज फिल्डिंग करण्यासाठी सीमारेषेवर जात असतानाच इंग्लंडच्या काही फॅन्सने त्याला स्टेडियममधून चिडवण्यासाठी स्कोअर विचारला. भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या एकाही फलंदाजाची विकेट काढता आलेली नाही, यावरून सिराजला ट्रोल करण्याचा त्या फॅन्सचा विचार होता. पण सिराजने 'स्कोअर काय झाला' या प्रश्नाला १-० असं बोटाने दाखवत थेट मालिकेत भारत आघाडीवर असल्याचं सांगितलं. त्याच्या या उत्तराने इंग्लंडच्या चाहत्यांची बोलतीच बंद झाली.

दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने बिनबाद १२० धावांपर्यंत मजल मारली. दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतके ठोकली. त्याआधी भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला आणि तो पूर्णपणे चुकला. भारताचा डाव अवघ्या ७८ धावांत कोलमडला. इंग्लंडच्या वेगवान चौकडीने भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. अँडरसन आणि ओव्हरटनने प्रत्येकी ३ तर रॉबिन्सन आणि करनने २-२ गडी बाद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT