Team-India 
क्रीडा

ICC ODI Rankings : टीम इंडियाच्या 'या' खेळाडूंचा दबदबा कायम; जडेजाची एन्ट्री!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी (ता.19) झालेला तिसरा एकदिवसीय सामना भारताने जिंकला आणि तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनी या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. 

त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)ने फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंची जागतिक क्रमवारी जाहीर केली. यामध्ये फलंदाजांच्या यादीत भारताची 'रणमशिन' म्हणून ओळखला जाणारा किंग कोहली अव्वलस्थानी, तर हिटमॅन रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत. 

विराटच्या खात्यात 886 गुण आहेत, तर रोहितच्या खात्यात 868 गुण जमा झाले आहेत. रोहितचे सलामीवीर जोडीदार अशी भूमिका निभावणाऱ्या शिखर धवन आणि के.एल.राहुल यांनी लक्ष्यवेधी कामगिरी करत सर्वांचे लक्ष्य वेधले. धवन 7 स्थानांनी आगेकूच करत 15 व्या स्थानी आला आहे, तर राहुलने 21 स्थानांची हनुमान उडी घेत 50 वे स्थान पटकाविले आहे.

गोलंदाजांच्या यादीत भारताच्या जसप्रित बुमराने 764 गुणांसह आपले सिंहासन कायम राखले आहे. त्याच्यानंतर फिरकीपटू रविंद्र जडेजा 2 स्थानांची झेप घेत 27 व्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (737 गुण) आणि अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब उर रेहमान (701 गुण) हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी विराजमान झाले आहेत. 

आयसीसीने जाहीर केलेल्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताच्या रविंद्र जडेजाने टॉप-टेनमध्ये स्थान मिळविले आहे. जडेजा या यादीत 10 व्या स्थानी असून त्याच्याव्यतिरिक्त एकाही भारतीय खेळाडूला या यादीत स्थान मिळालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Oil Crisis: पाकिस्तानात पेट्रोल साठ्यावरून नवा वाद! शहबाज सरकारच्या दाव्यांची पोलखोल; फक्त इतक्या दिवसांचा स्टॉक शिल्लक...

बाबो! प्रीती झिंटानं 'इतक्या' कोटींना विकला ब्रांद्यामधला अलिशान फ्लॅट, किंमत एकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल

Latest Marathi News Live Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 24 मार्च रोजी होणार

T20 World Cup 2026: सर्वाधिक धावा, सर्वाधिक विकेट्स कोणाच्या नावावर? अव्वल ३मध्ये भारतीय बॅटर नाही, गोलंदाजांत एक गडी

US-Israel-Iran War: एकमेकांवरील हल्ले अजूनही सुरूच; मृतांची संख्या चौदाशेहून अधिक, इराणमध्ये मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT