Virat Kohli and Rohit Sharma Have a Chance to break Martin Guptill Record esakal
क्रीडा

विराट - रोहितमध्ये पहिल्या टी 20 सामन्यात 'या' रेकॉर्डसाठी होणार फाईट

अनिरुद्ध संकपाळ

कोलकाता : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आजपासून (दि. 16) तीन सामन्यांची टी 20 मालिका सुरू होत आहे. या मालिकेत भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्यामध्ये एक मोठे रेकॉर्ड मोडण्यासाठी चढाओढ होण्याची शक्यता आहे. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 95 सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी 3227 धावा केल्या आहेत. रोहित देखील विराटच्या फारसा मागे नाही. त्यानेही टी 20 क्रिकेटमध्ये 3197 धावा केल्या आहेत. (Virat Kohli and Rohit Sharma Have a Chance to break Martin Guptill Record)

पहिल्या टी 20 सामन्यात रोहित शर्मा विराट कोहलीला गाठू शकतो. मात्र त्यापेक्षाही या दोघांच्या रडावर असणार आहे तो न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टील (Martin Guptill). मार्टिन गप्टीलने टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 3299 धावा केल्या आहेत. तो सध्या आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या (Highest runs in T20 International) यादीत टॉपवर आहे. विराट कोहलीला त्याला गाठवण्यासाठी अजून 73 धावांची गरज आहे. तर रोहित शर्मा 102 धावांनी पिछाडीवर आहे. धावांच्या बाबतीत पाहिले तर विराट कोहली गप्टीलचा रेकॉर्ड लवकर मागे टाकू शकतो. मात्र त्याच्या सध्याचा फॉर्म पाहता हे जरा अवघड दिसतंय.

दुसरीकडे रोहित शर्माने जर वेस्ट इंडीजविरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात शतक ठोकण्याचा भीम पराक्रम केला तर तो विराट आणि मार्टिन गप्टीलला एका खेळीतच मागे टाकू शकतो. सध्या विराट कोहलीकडे कोणत्याही संघाचे कर्णधारपद नाहीये. तो सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. त्याला वेस्ट इंडीज विरूद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यात फक्त 26 धावा करता आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mallikarjun Kharge: मणिपूर दौरा म्हणजे ढोंग व दिखावा; खचलेल्या लोकांचा अपमान केल्याचा खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर आरोप

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अर्शदीप सिंगला संधी मिळणार? कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग XI?

SCROLL FOR NEXT