virat kohli can not be an opening batsman virender sehwag sakal
क्रीडा

विराट कोहली T20 World Cup मध्ये ओपनिंग करणार? वीरेंद्र सेहवागचे धक्कादायक विधान

विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात तीन आकड्यांचा टप्पा ओलांडला आणि त्याच्या शतकाचा दुष्काळ संपवला...

Kiran Mahanavar

Virender Sehwag on Virat Kohli Batting Position : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी आशिया कपच्या सुपर-4 फेरीत शतक झळकावले. विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात तीन आकड्यांचा टप्पा ओलांडला आणि त्याच्या शतकाचा दुष्काळ संपवला. विराट ओपनिंगला आला आणि 122 धावा करून नाबाद परतला. भारताने हा सामना 101 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. अशा स्थितीत अफगाणिस्तानविरुद्धच्या यशानंतर डावाची सुरुवात कोहलीने करावी का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Cricbuzz शी बोलताना भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने विराट कोहली सलामीवीर का होऊ शकत नाही हे स्पष्ट केले. सेहवागने काही युक्तिवाद केले आणि चाहत्यांना आठवण करून दिली की रोहित शर्मा विश्रांती घेत असल्यामुळे भारताच्या माजी कर्णधाराला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. तब्बल तीन वर्षांनंतर विराट कोहलीने 8 सप्टेंबर रोजी आशिया कपच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावले. त्याच्या 71 व्या आंतरराष्ट्रीय शतकासह, तो आता रिकी पाँटिंगच्या बरोबरीने आला आहे आणि फक्त सचिन तेंडुलकर त्याच्या पुढे आहे.

सचिन तेंडुलकरचे शतकांच्या शतकाचे रेकॉर्ड फक्त विराट कोहली मोडू शकतो हे खुद्द क्रिकेटच्या देवाने म्हणजे सचिन तेंडुलकरने सांगितले होते. विराटचा हा प्रवास गेली तीन वर्षे 70 शतकांवर रखडला होता. अखेर त्याने आपल्या 522 व्या डावात 71 वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकत आपल्या शतकांच्या शतकाकडील प्रवासाला वेग दिला. जर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या 71 वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकण्याच्या प्रवासाची तुलना केली तर या तुलनेत विराट कोहली किंचीतसा आघाडीवर असल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेअर बाजाराला युद्धझळा! कच्चे तेल महागले, गॅसची टंचाई; रुपयाची घसरगुंडी, सोनं झालं स्वस्त

मोठी बातमी! ३ लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची होणार पडताळणी; ‘एसआयटी’ला ३ महिने मुदतवाढीचा प्रस्ताव; २,७९६ शिक्षकांची माहितीच मिळेना

Donald Trump Iran War Statement : युद्ध संपलंय... डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान, मात्र इराणे दिले हे प्रत्युत्तर

कर्जमाफीचा लाभ ३० जूनपूर्वीच! ...तरच ७/१२ उताऱ्यावरील कर्जाचा बोजा होईल कमी; सहकार विभाग सरकारला पाठविणार पात्र शेतकऱ्यांची माहिती, वाचा...

Satara Crime: साताऱ्यातील निवासी शाळेत २४ मुलांवर अत्‍याचार; केअरटेकरच्या प्रतापाने राज्यात खळबळ, मुले घाबरली अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT