Virat Kohli Twittet
क्रीडा

विराटची पाकिस्तानी क्रिकेटरकडून पाठराखण; केलं महत्त्वाचं विधान

विराज भागवत

वाचा, कॅप्टन कोहलीबद्दल नक्की काय मांडलं मत...

IND vs ENG 3rd Test: भारतीय संघाची आजपासून तिसरी कसोटी सुरू होणार आहे. पहिल्या दोन पैकी एका कसोटीत इंग्लंडला पराभूत करून भारतीय संघ मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. पण असे असले तरी भारताला पुढील तीन कसोटी सामन्यांमध्ये अशीच कामगिरी करावी लागणार आहे. इंग्लंडच्या संघात कदाचित काही बदल होणे अपेक्षित आहेत. पण भारतीय संघात बदल होणं फारच कठीण आहे. सर्वच खेळाडू उत्तम खेळ करत असल्याने काही प्रतिभावंत खेळाडूंना संघाबाहेर बसावं लागलं आहे. पण असे निर्णय घेतले जात असल्याचा दोष आपण कर्णधार विराट कोहलीला देऊ शकत नाही, असे मत पाकिस्तानचा माजी सलामीवीर सलमान बट याने व्यक्त केले.

"भारताचा संघ निवडणं ही सध्या एक मोठी कसोटीच आहे. काही अनुभवी आणि अफलातून कामगिरी करणारे खेळाडू बाकावर बसून राहिले आहेत. त्यातील समजा अश्विनला संघात घेतलं तर तो नक्कीच चांगली कामगिरी करून दाखवेल. त्याला जाडेजाच्या जागी संघात स्थान दिले तरीही संघातील संतुलन बिघडणार नाही. इंग्लंडने डेव्हिड मलानला संघात स्थान दिलं आहे. त्यांच्याकडे रॉरी बर्न्स हा दुसरा सलामीवीर आहे. म्हणजेच दोन डावखुरे सलामीवीर असताना कदाचित अश्विनला संघात स्थान देण्यात येऊ शकते. पण तसे झाले नाही, तरीही त्याचा दोष विराटला देता येणार नाही", असे मत सलमानने व्यक्त केले.

Team India

"अश्विन हा एक चतूर फिरकीपटू आहे. अश्विन हवेत चेंडू सोडण्यात अतिशय हुशार आहे. संथगतीने गोलंदाजी करणे आणि चेंडू जास्त वळवण्याचा प्रयत्न करणे यात अश्विन चांगलाच माहिर आहे. पण सध्याचा भारताचा संघ हा अत्यंत संतुलित आहे. अशा परिस्थितीत खेळपट्टीच्या मुद्द्यावर कदाचित ते एखाद दुसरा बदल करी शकतील. पण जर त्यांनी अश्विनला घेतलं नाही किंवा कोणताही बदल केला नाही, तरीही आपण विराटला त्याचा दोष देऊ शकत नाही. कारण त्यांचा संघ विजयी होतोय", अशी भावनाही सलमानने व्यक्त केली.

भारताचा संघ बलाढ्य!

"तुमच्याकडे शिखर धवन आणि हार्दिक पांड्यासारखे अतिशय धडाकेबाज खेळाडू असतानाही तुम्ही त्यांना १५ जणांच्या संघात स्थान देत नाही. अशा प्रकारचे धाडस तोच संघ करू शकतो ज्या संघाकडे प्रतिभावान खेळाडूंचा मोठ्या प्रमाणावर भरणा असतो. अशा खेळाडूंना मागे ठेवून थेट इंग्लंडसारख्या तुल्यबळ संघाशी खेळायला भारताचा संघ गेला यावरून कोणताही क्रिकेट चाहता याचा अंदाज बांधू शकतो की भारतीय संघ किती बलाढ्य आहे", असे मत भारताचे माजी क्रिकेटर फारूख इंजिनियर यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : सरकारने लोकांची गैरसोय करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला- आशुतोष रांका

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT