Ajinkya Rahane sakal
क्रीडा

Ajinkya Rahane: माझीच नाही विराट-पुजाराची कामगिरी ढासळली, BCCI वर अजिंक्यचा पलटवार

अजिंक्य रहाणे बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर...

Kiran Mahanavar

Ajinkya Rahane : रणजी ट्रॉफीमध्ये अजिंक्य रहाणेने द्विशतक झळकावून पुनरागमन केले आहे. तो बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. पण तरीही त्याने पुनरागमनाची आशा सोडलेली नाही. रहाणेने रणजी ट्रॉफी सामन्यात हैदराबादविरुद्ध मुंबईकडून खेळताना द्विशतक केले. रहाणेने 204 धावा केल्या. कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर रहाणेला गेल्या 3 वर्षांत केवळ एक शतक आणि 2 अर्धशतके झळकावता आली आहेत.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला की, मी कोहली आणि पुजाराने फलंदाज म्हणून कोणतीही चूक केली नाही. नंबर-3, नंबर-4 आणि नंबर-5 बद्दल बोलायचे तर तुम्हाला दिसेल की सर्व बॅटर्सची सरासरी खाली आली आहे. विकेटमुळे हे घडले आहे. त्यात फार चुका झाल्या आहेत असे मला वाटत नाही, असे ते म्हणाले.

पुढे बोलताना तो म्हणाला की, मधल्या फळीतील फलंदाजांसाठी फलंदाजी करणे कठीण झाले आहे. सलामीवीरांना कठीण चेंडू मिळत असल्याने ते सोपे असते, पण जेव्हा एखादा फलंदाज बाद होतो, तेव्हा आपण विचार करतो की आपण कुठे चुकलो. अजिंक्य रहाणे स्वत:बद्दल म्हणाला की, त्याला काहीही सिद्ध करायचे नाही, पण एक गोष्ट नक्की, मी कधीही हार मानणार नाही.

अजिंक्य रहाणेने कामगिरी खाली येण्याबद्दल जे सांगितले आहे, जर तुम्ही आकडे बघितले तर ते अगदी बरोबर दिसते. 2017 ते 2019 या तीन वर्षात भारतातील नंबर-3 ते नंबर-5 फलंदाजांची कामगिरी पाहिली तर कोहलीने 31 डावांमध्ये 49 च्या सरासरीने सर्वाधिक 1458 धावा केल्या. 5 शतके झळकावली. पुजाराने 29 डावात 45 च्या सरासरीने 1268 धावा केल्या आणि 6 शतके झळकावली. तर रहाणेने 26 डावात 41 च्या सरासरीने 983 धावा केल्या. 2 शतके आणि 7 अर्धशतके केली. कसोटीबद्दल बोलायचे झाले तर पुजारा नंबर-3 वर, कोहली नंबर-4 आणि रहाणे बहुतेक नंबर-5 वर खेळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Devastanam Scam : तिरुपती देवस्थानात लाडू घोटाळ्यानंतर आता दुसरा घोटाळा, तुमचीही फसवणूक झाली असेल; काय आहे घोटाळा?

CBSE Class 10 Board Exam: सीबीएसईने 10वीच्या बोर्ड परीक्षेबाबत मोठा बदल! जाणून घ्या काय आहेत नवीन नियम...

Latest Marathi News Live Update : मिरजमध्ये लग्नावरून राडा! दोन कुटुंबांत हाणामारी; ६ जण जखमी, ११ जणांवर गुन्हा दाखल

Gold Rate Today : सोन्याचा भाव अचानक वाढला, चांदीतही मोठी उसळी; जाणून घ्या आजचा ताजा भाव

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना हमी, लेकरांना पैशांची कमी; ‘बालसंगोपन’च्या दीड लाख लाभार्थ्यांना मिळेना निधी

SCROLL FOR NEXT