Virat Kohli Complete 8000 Test runs Ricky Ponting  ESAKAL
क्रीडा

विराटने 100 व्या कसोटीत पाँटिंगच्या हातावर मारला हात

सकाळ डिजिटल टीम

भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिली कसोटी विराटसाठी खास ठरली. विराट कोहली (Virat Kohli 100th Test) शंभराव्या कसोटी सामन्यात भारताच्या दिग्गज फलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. याचबरोबर त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या (Ricky Ponting) पावलावर पाऊल ठेवले. त्याने एक खास माईलस्टोन आजच्या सामन्यात 38 धावा करून पार केला. विराट कोहलीने कसोटी मधील 8000 धावा पूर्ण केल्या आहे. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये 8000 धावा पूर्ण करणारा तो सहावा फलंदाज ठरला आहे.

विराट कोहलीने 169 डावांमध्ये 8000 कसोटी धावा पूर्ण केल्या. यापूर्वी भारताकडून सचिन तेंडुलकर (154 डाव) राहुल द्रविड (158 डाव), विरेंद्र सेहवाग (160 डाव), सुनिल गावसकर (166 डाव) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (201 डाव) यांनी भारताकडून कसोटीत 8000 धावा पूर्ण केल्या आहेत.

विशेष म्हणजे आपल्या 100 व्या कसोटी सामन्यात 8000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा एकमेव खेळाडू नाही. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगनेही 2006 ला सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आपल्या 100 व्या कसोटीत 8000 कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. विराट कोहलीने 38 धावा करत आपल्या कसोटीतील 8000 धावा पूर्ण केल्या. तो आज शंभराव्या कसोटीत शंभर करून अजून एक विक्रम करणार असे वाटत असतानाच तो 45 धावांवर बाद झाला.

भारताने श्रीलंकेविरूद्धच्या (India vs Sri Lanka) पहिल्या कसोटीत प्रथम फलंदाजी करत पहिल्या दिवशी चहापानापर्यंत 4 बाद 199 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून हनुमा विहारीने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. चहापानासाठी खेळ थांबला त्यावेळी ऋषभ पंत 12 तर श्रेयस अय्यर 14 धावा करून नाबाद होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Route Update : शक्तिपीठ महामार्गाबाबत अफवांना उधाण, मार्ग कुठून जाणार राजपत्र कधी होणार प्रसिद्ध...

घरात प्रचार करू नका म्हणल्यानं संतापले, शिंदेंच्या कार्यकर्त्यांची दोघांना मारहाण; ८ ते १० जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : श्रीरामपूर पाटबंधारे प्रकरणाची अंतिम सुनावणी आज

एका क्षणात संसार उद्ध्वस्त! साक्री–शिर्डी महामार्गावरील भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच अंत; दोन चिमुकली झाली पोरकी

BMC Election: सात महापौर-उपमहापौर निवडणूक रिंगणात, विरोधकांचे कडवे आव्हान; राजकीय प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT