Virat Kohli Emotional Post For Cristiano Ronaldo
Virat Kohli Emotional Post For Cristiano Ronaldo esakal
क्रीडा

Virat Kohli : कोणतीही ट्रॉफी तुझे फुटबॉलमधील योगदान... कोहलीने रोनाल्डोसाठी लिहिली भावनिक पोस्ट

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Emotional Post For Cristiano Ronaldo : मोरोक्कोने फिफा वर्ल्डकप क्वार्टर फायनलमध्ये पोर्जुगालचा 1 - 0 असा पराभव करत त्यांचे पॅकअप केले. पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोचा हा शेवटचा वर्ल्डकप असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या फुटबॉल विश्वातील महान फुटबॉलपटूंमधील एक रोनाल्डोचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्पप्न अधुरेच राहणार आहे. कदाचित रोनाल्डोचा हा पोर्तुगालकडून शेवटचा सामना देखील ठरू शकतो. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर रोनाल्डोसाठी एक भावनिक पोस्ट लिहित त्याचे कौतुक केले.

विराट कोहली ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी लिहिल्या आपल्या पोस्ट मध्ये म्हणतो की, 'कोणतीही ट्रॉफी किंवा टायटल तू जे फुटबॉलसाठी आणि जगभारातील चाहत्यांसाठी जे काही केलंस ते तुझ्यापासून हिरावून घेऊ शतक नाही. ज्यावेळी तुला खेळताना मी किंवा जगभरातील इतर लोकं जी अनुभूती घेत होते. तू जो प्रभाव पाडत होतास ते एखाद्या टायटलपूरतं मर्यादित नाहीये. हे एक देवाकडून मिळाले गिफ्ट आहे. प्रत्येकवेळी आपल्या ह्रदयापासून खेळणाऱ्या खेळाडूला मिळालेला हा आशीर्वाद आहे. तुझी कष्ट करण्याची पद्धत, समर्पण ही कोणत्याही खेळाडूसाठी एक प्रेरणा आहे. तू माझ्यासाठी सर्वकालीन महान खेळाडू आहेस.'

विराट कोहली आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोमध्ये अनेक बाबतीत समानता आढळून येते. दोघेही आपल्या फिटनेसवर खूप कष्ट घेतात. खेळताना खूप इन्टेंसिटीने खेळत असतात. ज्याप्रमाणे दैवी देणगी लाभलेला लिओनेल मेस्सी आणि कष्ट आणि समर्पणातून सर्वोच्च स्थानी पोहचलेला रोनाल्डो यांची तुलना होते. तशाच प्रकारची तुलना ही विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये कधीकाळी केली जायची. विराट कोहली देखील महान खेळाडू आहे. मात्र त्यालाही भारताला अजून पर्यंत आयसीसी ट्रॉफी जिंकून देता आलेली नाही. तसेच आरसीबीला देखील तो आयपीएल टायटल जिंकून देऊ शकलेला नाही. त्यामुळे विराटने या पोस्टद्वारे आपल्या मनातील भावना देखील बोलून दाखवल्याचे बोलले जात आहेत.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : एक दंगल झाली आणि त्यामुळे जगात कामगार दिन साजरा होऊ लागला, वाचा इतिहास

Maharashtra Din 2024 : बहु असोत सुंदर संपन्न की महा..प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.! महाराष्ट्र दिनाच्या द्या हटके शुभेच्छा

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

Labour Day : गरजूंना हमखास रोजगार मिळवून देणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहीत आहे का ?

SCROLL FOR NEXT