virat kohli fight with jonny bairstow
virat kohli fight with jonny bairstow sakal
क्रीडा

'तोंड बंद करून गपगुमान बॅटिंग कर'....भर मैदानात जॉनी बेयरस्टोशी भिडला विराट

Kiran Mahanavar

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन कसोटीतील तिसरा दिवसाचा खेळ सुरू आहे. सामन्यादरम्यान संपूर्ण थरार पाहायला मिळत आहे. पहिल्या दोन दिवसांत भारतीय संघाने या सामन्यात आपले पूर्णपणे वर्चस्व दाखवले आहे. पाचव्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाची सुरुवात जोरदार वादाने झाली. इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात मैदानावर वाद झाला. (virat kohli fight with jonny bairstow)

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स क्रीजवर आले. खेळ सुरू झाल्यानंतर काही वेळातच मोहम्मद शमी गोलंदाजी करत होता. त्यानंतर स्लिपमध्ये उभा असलेला विराट कोहली बेअरस्टोला काहीतरी म्हणाला. यावर जॉनी बेअरस्टोने विराट कोहलीला प्रत्युत्तर दित त्यावर या दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. विराट कोहली म्हणाला, मला काय करायचं आहे ते सांगू नकोस, तोंड बंद करून बॅटिंग कर.

विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात जोरदार वादावादी झाला त्यावर पंचांनाही हस्तक्षेप करावा लागला. दोन्ही पंचांनी कोहली आणि बेअरस्टो यांना शांत राहायला सांगितले. त्यानंतर वातावरण थोडे शांत झाले, मोहम्मद शमीचे ओव्हर संपले तेव्हा ब्रेकच्या दरम्यान विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात हसताना चर्चा झाली.

कालच्या दिवशी पाऊस पडला तेव्हा विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टोचा फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये दोघेही हसत, मस्करी करत पॅव्हेलियनच्या दिशेने जात होते. एजबॅस्टन कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे, भारताने प्रथम फलंदाजी करताना 416 धावा केल्या आहेत. इंग्लंडने तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत 6 गडी गमावून 200 धावा केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT