Virat Kohli Anushka sharma post  esakal
क्रीडा

Virat Kohli: 'आय लव यू विराट...फक्त तूच'! अनुष्काची कडक पोस्ट

विराटच्या पत्नीनं अभिनेत्री अनुष्कानं त्याच्या कौतूकासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेयर केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Virat Kohli Anushka post Viral: दिवाळीचा दुसरा दिवस विराट कोहलीच्या बँटींगमुळे नेहमीच लक्षात राहिल. त्यानं केलेल्या जोरदार बॅटींगच्या जोरावर भारतीय संघानं सामना जिंकला. विराटच्या विराट खेळीच देशभरात कौतूक होतंय. यासगळयात विराटच्या पत्नीनं अभिनेत्री अनुष्कानं त्याच्या कौतूकासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये तिनं व्यक्त केलेल्या भावना चाहत्यांना आवडल्या आहेत.

अनुष्कानं भलीमोठी पोस्ट शेयर करत विराट भावूक झाल्याचा एक फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामध्ये ती म्हणते, आज तू जे काही केलं आहेस त्याचा मला अभिमान आहे. जे होतं ते एकदम सुंदर म्हणावं असचं. तू अजिंक्य आहेस. तुला कुठल्याही सीमेत बांधून ठेवता येणार नाही. त्यासाठी अनुष्कानं विराटला लिमिटलेस असे म्हटले आहे. विराटवर लिहिलेल्या त्या पोस्टचे कौतूक होताना दिसते आहे. त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहे.

तुझ्या खेळीनं साऱ्या देशाला खूप आनंद झाला आहे. कोट्यवधी लोकांना आज तू दिवाळीचं मोठं गिफ्ट दिलं आहे. तुझा खेळ, त्यातील मेहनत, एकाग्रता हे सारं आम्हाला प्रभावित करणारं होतं. म्हणून मला तू नेहमीच लिमिटलेस वाटत आला आहे. माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा सामना होता.

आपल्या मुलीनं देखील हा सामना खूप इंजॉय केला. कदाचित त्या छोट्या जीवाला अजुन कळालं नसेल की आपली आई घरात एवढ्या आनंदात का नाचते आहे? मला तुझा खूप गर्व आहे. तुझे मनपूर्वक अभिनंदन. अशा शब्दांत अनुष्कानं विराटचे कौतूक केले आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान सामन्याची सगळीकडे चर्चा होती.

या सामन्यात कोण जिंकणार, भारत पाकिस्तानचा बदला घेणार का, दिवाळीत चाहत्यांना विजयाचं गिफ्ट देणार का असे प्रश्न सातत्यानं उपस्थित होत होते. अखेर आज टी 20 वर्ल्ड कपमधला पहिला साखळी सामना पार पडला. भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या विरोधातील या सामन्यानं साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्नमध्ये एक लाख लोकांच्या उपस्थितीत हा सामना झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT