Virat Kohli
Virat Kohli  esakal
क्रीडा

'विराट कोहली हाव सुटलेला माणूस नाही'

अनिरुद्ध संकपाळ

वाद विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेनंतर त्याचा आणि बीसीसीआयमधील वाद चव्हाट्यावर आला होता. विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20 कर्णधारपद (T20 Captaincy) सोडताना त्याला कोणी रोखले नव्हते असे सांगितले. विराटचे हे वक्तव्य सौरभ गांगुली (Sourav Ganguly) यांच्या त्यांनी विराटला टी 20 संघाचे कर्णधारपद न सोडण्यास सांगितल्याच्या वक्तव्याच्या उलट होते. त्यामुळे कोणाचे वक्तव्य खरे आहे याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. विराट कोहलीने एकदिवसीय आणि कोसोटी संघाचे नेतृत्व पुढेही करु इच्छितो असे त्याने बीसीसीआयला (BCCI) सांगितले होते असा वक्तव्य पत्रकार परिषदेत केले होते.

दरम्यान, विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेनंतर अनेक माजी खेळाडूंच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आता विराट कोहलीचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी 'कसोटी कर्णधार विराट कोहली ज्यावेळी मैदानात उतरतो त्यावेळी तो हे सगळे वाद बाजूला ठेवतो. याचा कोणताही परिणाम त्याच्या खेळावर होत नाही. विराट कोहली (Virat Kohli) कोणत्याही गोष्टीची हाव धरत नाही. तो मैदानावर आपला शंभर टक्के जोर लावतो.' अशी प्रतिक्रिया खेलनिती या पॉडकास्टमध्ये दिली.

राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) पुढे म्हणाले की, 'एखाद्या खेळाडूवर या सर्व वादांचा परिणाम होणे स्वाभविक आहे. मात्र मला आशा आहे की बीसीसीआय ही परिस्थिती प्रभावीपणे हाताळेल. हे प्रकरण आता पुढे वाढवले जाणार नाही.' शर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेसारख्या (India Tour Of South Africa) महत्वाच्या दौऱ्याआधी भारतीय संघात वाद होऊ नयेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, ' मी या विषयावर जास्त बोलणार नाही कारण हा विषय थेट विराटशी संबंधित आहे. जर दोन्ही बाजूंनी असे जहाल शब्दप्रयोग वापरायला नको होते. संघ चांगली कामगिरी करत आहे. आता आपल्याला कोणताही वाद नको आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

Success Story : पोरीची जिद्दच लय मोठी! अपघातात हात गमावला तरी अनामता डगमगली नाही, बोर्डात मिळवले ९२ टक्के मार्क्स

SCROLL FOR NEXT