Virat Kohli Reply To Babar Azam Tweet 
क्रीडा

बाबर आझमच्या ट्विटला विराट उत्तर देणार का? शाहिद आफ्रिदी म्हणाला...

बाबरच्या या ट्विटने भारतातही चाहत्यांची मने जिंकली तर दुसरीकडे पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने बाबरच्या ट्विटवर मोठे वक्तव्य केले आहे.

Kiran Mahanavar

Shahid Afridi react on Babar Azam : विराट सध्या खराब फॉर्मशी झगडताना दिसत आहे. अनेक क्रिकेट पंडित त्याच्यावर टीका करताना दिसत आहेत. पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने विराट कोहली खराब फॉर्ममधून जात असल्याबद्दल ज्याचे कौतुक करत एक ट्विट केले.

बाबर आजमने ट्विट करत विराटला आधार देण्याचा प्रयत्न केला. ‘ही वेळही निघून जाईल, मजबूत रहा’ असा संदेश लिहिताना त्याने विराट सोबतचा एक फोटोही पोस्ट केला आहे. बाबरच्या या ट्विटने भारतातही चाहत्यांची मने जिंकली तर दुसरीकडे पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने बाबरच्या ट्विटवर मोठे वक्तव्य केले आहे. (Virat Kohli Reply To Babar Azam Tweet)

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही बाबरचे कौतुक केले. बाबरने जे ट्विट केले आहे त्याचे उत्तर विराट कोहलीने द्यावे, असे आफ्रिदीने पाकिस्तानी टीव्हीवर म्हटले आहे. शाहिद म्हणाला, बाबरने अविश्वसनीय संदेश दिला. मात्र दुसऱ्या बाजूने काही प्रतिक्रिया आल्या की नाही माहीत नाही. मला वाटतं विराटने आत्तापर्यंत उत्तर द्यायला हवं होतं. बाबरच्या ट्विटला रिप्लाय आला तर खूप मोठी गोष्ट असेल. पण असे होईल असे वाटत नाही.

कोहली जरी टी-20 आणि ODI मध्ये मोठी धावा करू शकला नसला तरी ODI मध्ये तो अजूनही ICC ODI रँकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहली 16 धावा काढून बाद झाला. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताने आधी 1-0 अशी आघाडी घेतली होती. इंग्लंडने आता 1-1 अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर भारताला वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका खेळायची आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत विराट कोहलीचा समावेश करण्यात आलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT