Virat Kohli 
क्रीडा

"विराटच्या निर्णयाचा टीम इंडियाला T20 World Cupमध्ये फायदाच"

विराज भागवत

कोहलीचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा यांचं मत

Virat Kohli Stepped down from T20 Captaincy: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने टी२० विश्वचषक २०२१नंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले. कामाच्या ताणामुळे हा निर्णय घेतल्याचे तो ट्वीटमध्ये म्हणाला. विराटने विश्वचषक स्पर्धेनंतर कर्णधारपद सोडणार असल्याचं सांगितलं आहे, त्यामुळे या निर्णयाचा भारताला T20 World Cupमध्ये फायदाच होईल, असं मत विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी व्यक्त केले.

"नवा कर्णधार आपल्या नव्या कल्पना आणि योजना संघात राबवेल. त्याचा संघाला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे नवा कर्णधार कोण असेल याची नक्कीच उत्सुकता आहे. ज्याप्रमाणे धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर विराटला नेतृत्वात मदत केली, तसाच विराटही नव्या कर्णधाराला नक्की मदत करेल. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विराटने विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडणार असल्याचे स्पष्ट केलंय. त्याच्या या निर्णयाचा टीम इंडियाला फायदाच होईल. कारण कोणताही कर्णधार उंचीवर असताना पद सोडण्यास उत्सुक असतो. त्यामुळे विश्वचषक जिंकून पद सोडायचं असा विचार विराट करत असेल. आणि त्यामुळे तो सर्वोत्तम कामगिरी करेल", असे शर्मा म्हणाले.

"विराटने कर्णधारपद सोडण्याचा जो निर्णय घेतला आहे तो निर्णय खूपच विचारपूर्वक घेतला आहे. त्याने या निर्णयाआधी माझ्याशीही चर्चा केली होती. तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करायचे हा विचार कोणत्याही खेळाडूला दडपणाखाली ठेवतो. त्यामुळेच त्याने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि माझा त्याच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा आहे", असेही शर्मा यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल - खासदार सुनील तटकरे

Satara News: हरवलेली लेक अन् काळजीत आई; शिंगणापूर पोलिसांच्या तत्परतेने पुन्हा घडली मायलेकींची भेट, काळोखात नेमकं काय घडलं?

Malkapur Auto Garage Battery Theft, One Thief Caught: गॅरेज फोडून बॅटऱ्या चोरणाऱ्याला रंगेहात अटक

SCROLL FOR NEXT