Virat Kohli  Mohammed Rizwan
Virat Kohli Mohammed Rizwan esakal
क्रीडा

Virat Kohli : फॉर्ममध्ये येताच विराटने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला टाकले मागे

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Asia Cup 2022 : भारताचा अव्वल फलंदाज विराट कोहलीने जवळपास सहा महिन्यानंतर अर्धशतक ठोकले. त्याने आशिया कपमधील हाँगकाँग विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात 44 चेंडूत 59 धावा केल्या. यात 3 षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. विराट कोहलीने सूर्यकुमार यादव सोबत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 98 धावांची भागीदारी रचली. सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत नाबाद 68 धावांची तुफानी खेळी केली. (Virat Kohli Surpasses Pakistan Mohammed Rizwan In Highest Average In T20I)

विराट कोहलीने 101 टी 20 सामन्यात 3 हजार 402 धावा केल्या आहेत. त्याची आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधील सरासरी 50.77 इतकी झाली आहे. त्याने टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 31 अर्धशतके ठोकली असून नाबाद 94 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याचा स्ट्राईक रेट हा 137.12 इतका राहिला आहे.

विराट कोहलीने हाँगकाँग विरूद्धच्या सामन्यात 59 धावांची खेळी करत टी 20 मधील सर्वोत्तम सरासरी राखणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. त्याने या यादीत पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकले. 57 टी 20 सामने खेळलेल्या मोहम्मद रिझवानची टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सरासरी 50.14 इतकी आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंडच्या डेव्हिड कानवॉयचा नंबर लागतो. त्याची सरासरी 47.20 इतकी आहे. तर चौथ्या क्रमांकावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे. त्याने 75 सामन्यात 44.93 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. या यादीत पाचव्या स्थानावर असलेल्या भारताच्या 39 सामने खेळणाऱ्या मनिष पांडेने 44.31 च्या सरासरीने धावा केल्या आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT