Virat Kohli Lata Mangeshkar  esakal
क्रीडा

Virat Kohli : कोणत्या ऐतिहासिक महिलेसोबत डिनर? विराटनं दिलं 'ह्रदयस्पर्शी' उत्तर

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Lata Mangeshkar : विराट कोहली हा भारतातच नाही तर जगभरात फॉलो केला जाणारा क्रिकेटपटू आहे. विराटच्या नावावर अनेक क्रिकेट रेकॉर्ड्स आहेत. त्याने भारतासाठी अनेक स्मरणीय खेळी केल्या आहेत. त्याची सचिन तेंडुलकरचे शतकांच्या शतकाचा विक्रम मोडण्याची मोहीम पुन्हा सुरू झाली आहे. अशा विराटला काही ऑफबीट प्रश्न विचारण्यात आले. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट कोहलीला या व्हिडिओत एक वेगळाच प्रश्न विचारण्यात आला. विराटला विचारण्यात आले की जर तुला एखाद्या ऐतिहासिक महिलेसोबत डिनर करण्याची संधी मिळाली असती तर तू कोणासोबत डिनर केला असतास?

यावर उत्तर देताना विराट कोहलीने 'मला लताजींना भेटण्याची कधी संधी मिळाली नाही. त्यामुळे मला त्यांच्याशी गप्पा मारायला अवडलं असतं, त्यांच्या आयुष्याबाबत आणि त्यांच्या जीवनप्रवासाबद्दल अजून जाणून घेण्याची इच्छा होती.'

विराट कोहली न्यूझीलंडविरूद्धच्या टी 20 मालिकेत खेळत नाहीये. तो आता थेट ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेत दिसणार आहे. दरम्यान, विराट आणि अनुष्काला उत्तराखंड येथील एका आश्रमता पाहिलं गेलं. याबाबतच फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होऊ लागले आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विराट कोहलीने स्वामी दयानंद जी महाराज यांच्या समाधी स्थाळाला भेट दिली. यावेळी तो ऋषीकेश येथील स्वामी दयानंतर आश्रमात गेला होता. मात्र विराट कोहलीचा प्रसिद्धी झोत तेथेही त्याच्या मागे मागे आलाच! जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटू असलेल्या विराट कोहलीची सही आणि फोटो घेण्यासाठी आश्रमात देखील झुंबड उडाली होती.

(Sports Latest News)

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शॉ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Incident: 180 प्रवाशांचा जीव... '9/11' सारख्या हल्ल्याचा धोका; फ्लायदुबईच्या भारतीय कॅप्टनमुळे टळला मोठा अपघात, नेमकं काय घडलं?

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाण्यात तणाव; आदित्य ठाकरे, संजय राऊत कापूरबावडी पोलिस ठाण्यात

Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव टँकरचा थरार; दुचाकीला धडक देऊन चालक फरार, २१ वर्षीय तरुण ठार

Latest Marathi News Live Update : शेखर गोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

SCROLL FOR NEXT