Virat Kohli ICC Award
Virat Kohli ICC Award  esakal
क्रीडा

Virat Kohli : कोहलीच किंग! रेकॉर्ड ब्रेक चौथ्यांदा जिंकला ODI Cricketer Of The Year चा पुरस्कार; दोस्त एबीला टाकलं मागं

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli ICC Men's Cricket World Cup 2023 : भारताचा रन मशिन विराट कोहलीने आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयरचा सलग चौथ्यांदा पुरस्कार पटकावला. आयसीसीने नुकतेच 2023 चा वनडे क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार जाहीर केला. या पुरस्कारावर विराट कोहलीने आपली मोहर उमटवली आहे.

विराट कोहलीसाठी 2023 वर्ष हे अत्यंत चांगलं गेलं आहे. त्याने मायदेशात झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये रेकॉर्ड ब्रेक धावा केल्या. त्याच्या बॅटिंगमुळे भारताचा फायनलपर्यंतचा मार्ग सुकर झाला होता. विराट कोहलीने 2023 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये 27 सामन्यात 1377 धावा केल्या आहेत. याचबरोबर त्याने 12 झेल आणि 1 विकेट देखील घेतली.

विराट कोहलीने तब्बल चौथ्यांदा आयसीसी वनडे प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार पटकावला आहे. त्याने नुकत्याच झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये धडाकेबाज कामगिरी केली होती. यापूर्वी विराट कोहलीने 2012, 2017 आणि 2018 मध्ये आयसीसी वनडे प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार पटकावल होता.

विराट कोहली हा चारवेळा पुरस्कार पटकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने एबी डिव्हिलियर्सला देखील मागं टाकलं आहे. डिव्हिलियर्सने तीनवेळा हा पुरस्कार पटकावला होता. विराट कोहलीने मोठ्या बॅडपॅचनंतर 2022 मध्ये जोरदार कमबॅक केलं होतं. त्यानंतर तो आपल्या जुन्या अवतारात परतला अन् त्यानं वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये मालिकावीराचा पुरस्कार पटकावला.

विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये 11 डावात नऊ वेळा अर्धशतक पार केलं आहे. त्याने वर्ल्डकपमध्ये 765 धावा ठोकत एका वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने 2003 मध्ये 676 धावा केल्या होत्या. याचबरोबर विराट कोहली हा एका वर्ल्डकपमध्ये 700 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT