virat kohli 
क्रीडा

विराटची 100 मिलीयन क्लबमध्ये एन्ट्री; पहा कोणत्या फोटोंमुळे केला विक्रम

सकाळ डिजिटल टीम

भारताचा क्रिकेटपटू रनमशिन विराट कोहलीच्या नावावर क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रम आहेत. विराटच्या खेळाचे चाहते जगभरात आहेत. सोशल मिडियावरही त्याची लोकप्रियता मोठी आहे. नुकताच विराटने त्याच्या इन्टाग्रामवर 100 मिलीयन पेक्षा फोलोअर्सचा टप्पा पार केला आहे. 100 मिलीयन फोलअर्स होणारा विराट आशियातील पहिला व्यक्ती आहे. दुसऱ्या स्थानावर बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आहे. प्रियांकाचे 60 मिलीयन पेक्षा अधिक फोलोअर्स इन्साग्रामवर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर अभिनेत्री श्रध्दा कपूर आहे. श्रध्दाचे 58 मिलीयन फोलोअर्स आहेत.क्रिकेट विश्वातील 100 मिलीयन फोलोअर्स असणारा विराट पहिला खेळाडू आहे. विराटचे 100 मिलीयन पूर्ण झाल्याबद्दल त्याच्या इंन्टाग्रामवरील  काही खास पोस्ट पहा. 

 29 ऑगस्ट 2020 रोजी नॅशनल स्पोर्टस डे आणि महान हॉकीपटू ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त एक पोस्ट केली होती. विराटने हॉकीपटू  कॅप्टन आणि एथलीट असणारे महान खेळाडू ध्यानचंद यांचा फोटो पोस्ट केला. या फोटोला त्याने कॅप्शन 'महानतम' असे दिले होते.

IND vs ENG: चौथ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका, जसप्रीत बुमराहची माघार
 
विराटने अनुष्का शर्मा प्रेग्नंट असल्याची गुड न्युज चाहत्यांना सोशल मीडियावर दिली होती. कोहलीने अनुष्का सोबतचा एक रोमॅंटीक फोटो पोस्ट करून 'जानेवारी 2021 मध्ये आम्ही दोघांचे तिघे होणार आहे' असे कॅप्शन दिले होते. फोटोवर अनुष्का आणि विराटच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता.         

विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माला सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते. 28 मार्च 2016 रोजी विराटने त्या ट्रोलर्सला उत्तर देण्यासाठी एक पोस्ट इंस्टाग्राम शेअर केली. या पोस्टमध्ये 'शेम' असे लिहीले आहे. या फोटोला विराटने कॅप्शन दिले की,'अशा व्यक्तींची लाज वाटते जे स्वत;ला सुशिक्षित समजतात पण अनुष्काबद्दल वाईट बोलतात.' ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिल्यामुळे तेव्हा विराटचे कौतुक झाले होते.

--- 

---- 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pachod News : पोळ्याच्या आनंदावर दुष्काळाचे विरजण..! बैलांना आंघोळ घालायलाही नाही पाणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी चार युवक पाण्याच्या टाकीवर; सरकारच्या भूमिकेविरोधात संताप

Pune Crime : पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून पत्नीने संपविले जीवन

त्यांच्या मिसेस आमच्यासाठी चहा घेऊन आल्या... सचिन तेंडुलकरांच्या पाहुणचाराने भारावलेला निलेश साबळे; म्हणाला- जेव्हा ते आले...

SCROLL FOR NEXT