PKL 2021
PKL 2021 Twitter
क्रीडा

अर्जुनची सुपर 10 ची हॅटट्रिक, जयपूरसमोर यूपी योद्धा 'घायाळ'

सुशांत जाधव

जयपूर पिंक पँथर्स संघाने तीन सामन्यातील दुसरा सामनाही जिंकला

VIVO Pro Kabaddi 2021, PKL 2021 Jipur Pink Panthers vs UP Yoddha : अर्जुन देसवालच्या (Arjun Deshwal) सुपर 10 च्या जोरावर जयपूर पिंक पँथरर्स संघानं स्टार रेडर प्रदीप नरवालच्या (PardeepNarwal) यूपी योद्धा संघाला नमवलं आहे. प्रदीप नरवालला दबावात टाकण्यात जयपूरच्या बचावपटूंना यश मिळालं. हा त्यांच्या खेळाच्या रणनितीचा एक महत्त्वाचा भाग ठरला.

पहिल्या हाफमध्ये प्रदीप नरवालला बराच काळ मैदानाबाहेर ठेवण्यात जयपूरचा संघ यशस्वी ठरला. परिणामी जयपूरला 19-12 अशी आघाडी मिळाली. दुसऱ्या हाफमध्ये प्रदीप नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला. त्याने केवळ तीन रेड पॉइंट्सच मिळवले. त्यामुळे यूपी योद्धा संघाला पराभवाचा सामना करावा लागला. जयपूरनं हा सामना 32-29 अशा फरकाने जिंकला. यूपी योद्धा संघाकडून सुरेंदर गिलने (Surender Gill) सुपर 10 कामगिरी केली. पण तो 10 पेक्षा अधिक गुण मिळवू शकला नाही. जयपूरकडून अर्जुनशिवाय दीपक निवास हुड्डा (DeepakNiwasHooda) याने 9 गुणांची कमाई केली.

पहिल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सनं यूपी योद्धा संघाला 38-33 अशा फरकाने पराभूत केले होते. पटणा पायरट्स विरुद्धच्या अटितटिच्या लढतीत यूपी योद्धा संघानं 36-35 असा विजय नोंदवत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला होता. त्यानंतर पुन्हा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे जयपूरच्या संघाला पहिल्या सामन्यात गुजरातने 34-27 असे पराभूत केले होते. हरियाणा स्टीलर्सला 40-38 अशी मात देत जयपूरने स्पर्धेत विजयाचे खाते उघडले. यूपी योद्धा विरुद्ध त्यांनी स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवला आहे.

अर्जुन देशवालची सुपर 10 ची हॅटट्रिक

जयपूर संघाचा रेडर अर्जुन देशवाल सध्याच्या हंगामात सुरुवातीपासून दमदार खेळी करताना दिसतेय. त्यानं हंगामात सुपर 10 ची हॅटट्रिक नोंदवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. यूपी विरुद्धच्या लढतीत त्याने सर्वाधिक 11 पॉइंट्स आपल्या खात्यात जमा केले. गुजरात विरुद्धच्या सामन्यात अर्जुननं 10 पॉइंट्स मिळवले होते. हरियाणा विरुद्ध त्याने यंदाच्या स्पर्धेतील वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी नोंदवली आहे. या सामन्यात त्याने 18 गुणांसह संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT