PKL 8 Points Table Twitter
क्रीडा

PKL 8 Points Table : Puneri Paltan तळाला, जाणून घ्या टॉपला कोण?

सुशांत जाधव

प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात सामन्यागणिक रंगत वाढत आहे. सोमवारी झालेल्या लढतीत बंगाल वॉरियर्सने (Bengal Warriors) पिंक पँथर्सला (Pink Panthers) 31-28 असे नमवले. दुसऱ्या सामन्यात तेलुगू टायटन्स (Telugu Titans) आणि पाटणा पायरेट्स (Patna Pirates) यांच्यातील रोमहर्षक लढतीत तेलुगू टायन्सने अवघ्या एका गुणाने बाजी मारली. शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या सामना 31-30 असा संपला. या सामन्यातील विजयानंतर बंगाल वॉरियर्स गुणतालिकेत 16 गुणांसह पाचव्या स्थानावर पोहचला. दुसऱ्या सामन्यात पराभूत झालेल्या पाटणा पायरट्स तिसऱ्या स्थानावर कायम आहे.

प्रो कबड्डीच्या आतापर्यंत झालेल्या लढतीत 6 पैकी 4 सामन्यातील विजयासह बंगळुरु बुल्सचा (Bengaluru Bulls) संघ 23 गुणांसह सर्वात अव्वल आहे. त्यांनी एक सामना गमावला असून एक सामना ड्रॉ खेळला आहे. त्यांच्या पाठोपाठ या यादीत दबंग दिल्लीचा (Dabang Delhi) नंबर लागतो. दिल्लीनं 5 पैकी 3 सामन्यातील विजयासह दोन सामने ड्रॉ खेळले आहेत. त्यांच्या पदरी एकही पराभव आलेला नाही. ते 21 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. पाटणा पायरेट्सने (Patna Pirates) 5 पैकी 4 सामने जिंकले असून एका पराभवसह ते 21 गुण मिळवून तिसऱ्या स्थानावर आहेत.

सलामीच्या लढतीत धमाकेदार विजय मिळवणारा यू मुम्बा (U Mumba) चौथ्या स्थानावर घसरलाय. त्यांनी 5 लढतीतील 2 सामने जिंकले आहेत तर दोन सामने बरोबरीत सोडवले आहेत. त्यांनी एका पराभवाचाही समावेश आहे. बंगाल वॉरियर्सनं (Bengal Warriors) 6 पैकी 3 विजय आणि 3 पराभवासह 16 गुण कमावले आहेत. ते पाचव्या स्थानावर आहेत. तमिळ थलायवाजने (Tamil Thalaivas) आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यात एक सामना जिंकला असून एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तीन सामने बरोबरीत सुटल्यामुळे त्यांच्या खात्यात 14 गुण आहेत.

गुजरात जायएंट्स (Gujarat Giants), यूपी योद्धा (UP Yoddha), पिंक पँथर्स (Pink Panthers), हरियाणा स्टिलर्स(Haryana Steelers), तेलुगू टायटन्स (Telugu Titans) आणि पुणेरी पलटन (Puneri Paltan) यांनी प्रत्येकी पाच पाच सामने खेळले आहेत. अनुक्रमे 13,13, 12,12 आणि 9,5 असे गुण मिळवले आहेत. गुणतालिकेत तळाला असलेल्या पुणेरी पलटनने एकमेव विजय मिळवला असून चार सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT