WC 2023 Pakistan Cricketers : वर्ल्ड कप 2023 दरम्यान पाकिस्तानी खेळाडू पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. पाकिस्तानला शुक्रवारी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळायचा आहे.
या सामन्यासाठी आयसीसी आणि बीसीसीआयकडून गाईडलाईन देण्यात आल्या आहेत की, कोणताही चाहता इस्रायल किंवा पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ कोणतेही पोस्टर किंवा प्लेकार्ड आणणार नाही. दरम्यान, अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.
पाकिस्तानचा उपकर्णधार शादाब खान, हारिस रौफ, मोहम्मद नवाज, सलमान आगा आणि इफ्तिखार अहमद यांसारख्या मोठ्या खेळाडूंनी पॅलेस्टाईनच्या ध्वजाचा फोटो ट्विटर तसेच इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
एवढेच नाही तर पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघातून बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू इमाद वसीम, संघातून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज फहीम अश्रफ, निवृत्त झालेला अझर अली आणि चालू वर्ल्ड कपमध्ये पदार्पणाची वाट पाहत असलेला उसामा मीर यांनीही पॅलेस्टाईनचा झेंडा फडकावला आहे.
याआधी मोहम्मद रिझवानने श्रीलंकेविरुद्धचा विजय आणि आपले शतक गाझाला समर्पित केले होते. श्रीलंकेविरुद्ध सामन्यात रिझवानने शतकीय खेळी खेळल्यानंतर X वर पोस्ट करत लिहिले की, हा विजय गाझामधील आमच्या बंधू-भगिनींसाठी आहे. विजयात योगदान दिल्याबद्दल आनंद झाला.
यानंतर भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यावर भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलॉन यांचे वक्तव्य समोर आले आहे. यामध्ये त्याने टीम इंडियाच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. त्याने पाकिस्तान संघ आणि त्याचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानवरही खरपूस समाचार घेतला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत तो म्हणाला की, पराभवानंतर पाकिस्तान आपला विजय हमासला समर्पित करू शकत नाही.
या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत इस्त्रायल-हमास युद्धाशी संबंधित फलक आणि पोस्टर्स काही वेळा मैदानावर झळकले आहेत. आता यावर बंदी घालण्यात आली आहे. केवळ फलकच नाही तर आता इस्रायल किंवा पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ कोणत्याही प्रकारच्या घोषणाबाजीवर बंदी घालण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.