West Indies Batsmen Rovman Powell Hit 104 meter Massive Six  esakal
क्रीडा

Rovman Powell : रोव्हमन पॉवेलचा 'भीमकाय षटकार' पाहून हुसैनने डोक्यालाच लावला हात

अनिरुद्ध संकपाळ

Rovman Powell Six WI vs ZIM : टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडीजने 6 बाद 101 धावा अशी झाली होती. त्यानंतर विंडीजचा आक्रमक फलंदाज रोव्हमन पॉवेलने विंडीजचा डाव सावरत 153 धावांपर्यंत मजल मारून दिली. दरम्यान, रोव्हमन पॉवेलने मुझराबनी टाकत असलेल्या षटकात दोन षटकार मारत 16 धावा वसूल केल्या. यातील एक षटकार तब्बल 104 मीटर लांब गेला. हा षटकार थेट स्टेडियमच्या बाहेरच लँड झाला.

विंडीजच्या डावाचे अखेरचे षटक सुरू होण्यापूर्वी त्यांच्या 6 बाद 137 धावा झाल्या होत्या. रोव्हमनने मुझराबनीच्या 20 व्या षटकाची सुरूवात षटकाराने केली. त्यानंतर त्याने याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर एक हूक शॉट मारला. हा शॉट चांगलाच मिडल झाला आणि थेट मैदानाबाहेर जाऊन लँड झाला. रोव्हमन पॉवेलने तब्बल 104 मिटर सिक्सर मारून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. हा फटका पाहून नॉन स्ट्राईकवर असलेल्या अकिल हुसैनने डोक्याला हातच लावला.

विंडीजची अवस्था 6 बाद 101 धावा अशी झाली असताना रोव्हमन पॉवेल आणि अकिल हुसैनने शेवटच्या 5 षटकात भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी केलेल्या 49 धावांच्या भागीदारीमुळे विंडीज झिम्बाब्वेसमोर 154 धावांचे आव्हान ठेवू शकला. रोव्हमन पॉवेल 21 चेंडूत 28 धावा करून 20 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर झेलबाद झाला. तर अकिल हुसैनने 18 चेंडूत नाबाद 23 धावा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT