west indies vs india 1st ODI india penalised for slow over rate
west indies vs india 1st ODI india penalised for slow over rate 
क्रीडा

Wi vs Ind: वेस्ट इंडिजमध्ये टीम इंडियाला लागला चुना, एक छोटी चूक पडली महागात

Kiran Mahanavar

West Indies vs India : टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात मोठा फटका बसला आहे. एका छोट्या चुकीमुळे टीम इंडियाच्या खिशाला कात्री लागले आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी भारतीय क्रिकेट संघाला मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकल्याचे आढळले, त्यानंतर सामनाधिकारी दंड ठोठावला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा भारताने तीन धावांनी पराभव केला. (Wi vs Ind 1st ODI India Penalised For Slow Over Rate)

टीम इंडियावर लावण्यात आलेल्या दंडाबाबत आयसीसीने रविवारी एक पत्र जारी केले की, आयसीसी आचारसंहितेच्या नियम 2.22 नुसार, जर कोणताही संघ किंवा खेळाडू स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला, तर त्याची मॅच फी 20 टक्क्यांनी कमी केली जाईल. आयसीसीच्या म्हणण्यानुसार, धवनने याबाबत आपली चूक मान्य केली आहे आणि आता यावर पुढील सुनावणीची गरज नाही.

टीम इंडियाने शुक्रवारी झालेल्या या सामन्यात कर्णधार शिखर धवनचे तीन धावांनी शतक हुकले. त्याने 99 चेंडूत 97 धावांची खेळी खेळली. यादरम्यान शिखरने 10 चौकार आणि तीन षटकार मारले. धवन आणि शुभमन गिलच्या 64 आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 50 षटकांत 7 गडी गमावून 308 धावा केल्या. प्रत्युत्तरात विंडीजचा संघ 6 बाद 305 धावाच करू शकला आणि 3 धावांनी सामना गमावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT