West Indies vs India 2nd Test Virat Kohli  esakal
क्रीडा

WI vs IND 2nd Test : भारताला झगडावे लागणार! 'विराट' शतकानंतर विंडीजनेही केले जोरदार पुनरागमन

अनिरुद्ध संकपाळ

West Indies vs India 2nd Test Virat Kohli : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 438 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने आपले शतक (121) पूर्ण केले. तर रविंद्र जडेजाने 61 धावांची आणि अश्विनने 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. विंडीजकडून रोच आणि वॉरिकन यांनी प्रत्येकी 3 बळी टिपले.

विंडीजने देखील आपल्या पहिल्या डावात चांगली फलंदाजी करत दिवस अखेर पर्यंत 1 बाद 86 धावा केल्या. वेस्ट इंडीज अजूनही पहिल्या डावात 352 धावांनी पिछाडीवर आहे. वेस्ट इंडीज ज्या प्रकारे पहिल्या डावात फलंदाजी करत आहे ते पाहता पहिल्या कसोटीप्रमाणे दुसराही कसोटी सामना भारत तीन दिवसात संपवू शकेल असे वाटत नाही.

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने आपला डाव 4 बाद 288 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. पहिल्या दिवशी 87 धावा करून नाबाद असलेल्या विराट कोहलीने आपले शतक पूर्ण केले. याचबरोबर रविंद्र जडेजाने देखील अर्धशतकी खेळी करत त्याला चांगली साथ दिली. (Virat Kohli 76th Hundred)

पहिले सत्र हे विराट कोहलीच्या शतकी खेळीने गाजले. विराट कोहलीने आपले 29 वे कसोटी शतक ठोकले. 500 व्या सामन्यात शतकी खेळी करणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्याने रविंद्र जडेजासोबत 5 व्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी रचली. या दोघांनी भारताला 350 च्या जवळ पोहचवले होते.

मात्र विराट कोहली 121 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर रविंद्र जडेजा देखील 152 चेंडूत 61 धावा करून बाद झाला. जडेजा बाद झाल्यानंतर इशान किशनने 25 धावांचे योगदान देत भारताला 400 धावांच्या जवळ पोहचवले. मात्र इशान किशनला सेट होऊनही मोठी खेळी करता आली नाही. तो होल्डरची शिकार झाला.

किशननंतर रविचंद्रन अश्विनने भारताला 400 धावांचा टप्पा पार करून दिला. त्याला साथ देण्यासाठी आलेल्या जयदेव उनाडकटने 27 चेंडूत 7 धावा करत त्याला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र वॉरिकनने उनाडकटला बाद केले. यानंतर आलेला सिराज देखील वॉरिकनच्या फिरकीत फसला.

भारताची अवस्था 9 बाद 426 धावा अशी झाली होती. त्यानंतर अश्विनने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्याला संघाला 450 धावांच्या पुढे पोहचवता आले नाही. त्याचा रोचने 56 धावांवर त्रिफळा उडवला. (Ravichandran Ashwin)

भारताच्या पहिल्या डावातील 438 धावांच्या प्रत्युत्तरात खेळण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडीजने चांगली सुरूवात केली. पहिल्या डावात सलामीवीर क्रेग ब्रेथवेट आणि तेगनारायण चंद्रपॉल यांनी 71 धावांची सलामी दिली. मात्र रविंद्र जडेजाने चंद्रपॉलला 33 धावांवर बाद केले.

यानंतर क्रेग ब्रेथवेटने कर्क मॅकेन्झीने विंडीजला दिवसाचा खेळ संपेपर्यंत 86 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारावेत, उद्धव ठाकरे यांची अपेक्षा; भाजपला सोडले की हिंदुत्व जाते का?

आजचे राशिभविष्य - 5 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT